आईला कायम सोबत जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंनी लढवली ही शक्कल, म्हणाले- "तिच्या वजनाएवढ्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:37 IST2025-03-18T18:33:40+5:302025-03-18T18:37:43+5:30
Sayaji Shinde: सयाजी शिंदे हे मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे.

आईला कायम सोबत जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंनी लढवली ही शक्कल, म्हणाले- "तिच्या वजनाएवढ्या..."
सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. दरम्यान अलिकडेच त्यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी झाडे लावण्याच्या उपक्रमाबद्दल सांगितले.
सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत अनेक वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले आहेत. या उपक्रमाची कल्पना कशी सुचली, याबद्दल त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ती कल्पना मला सुचली की आई जर आयुष्यातून जायची नसेल तर काय करता येईल याच्यावर मी खूप विचार करायचो. पैसे दिले हे दिले तरी हे वय थांबवता येत नाही ना आणि खूप अन्न आहे म्हणून पचन यंत्रणा चांगली आणू शकत नाही ना. आई नेहमी म्हणायची आरं अन्न दुसऱ्याचं आहे पॉट दुसऱ्याचं आहे का? आणि त्यामुळे आपल्या पोटाला लागेल तेवढंच खायला लागलं ना. काही देऊन काय उपयोग आहे त्याचा इतक्या साध्या साध्या गोष्टी सगळे जीवन भरलं होतं.
ते पुढे म्हणाले की, मग ती आपल्या आयुष्यातनं जाऊ नये तेव्हा मला कल्पना सुचली की देशी झाडांच्या बिया एका बाजूला ठेवायच्या एका बाजूला आईला ठेवायचं आणि तुला करायची. आईला म्हणालो तुझ्या वजनाएवढ्या बिया मी आता महाराष्ट्रात लावतो. मग त्यांना सावली येईल मग त्यांना फळ येतील त्याला फुलं येतील सुगंध येईल त्याच्यावर पाखरं बसतील आणि ह्या सगळ्या प्रकारात तू मला जिवंत दिसशील म्हणजे तू माझ्या आयुष्यातून जाणार नाही. तू मेल्यावर मी काय रडणार नाही. ह्या पद्धतीनं तू मी माझ्याबरोबर आयुष्यभर जिवंतच असशील त्यामुळे आपण ठरवलं की हा आपल्या आनंदाचा भाग आहे. आपल्या आईला दिलेला शब्द आहे .