'या बॉलला सिक्सर बसेल की...' क्रिकेटचं उदाहरण देत सायली संजीवनं सांगितली 'ती' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 01:19 PM2023-02-17T13:19:45+5:302023-02-17T13:22:19+5:30
Sayali Sanjeev : सायली संजीव प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते.
अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. काहे दिया परदेस ही सायलीची पहिली मालिका आणि पहिल्या मालिकेतूनच तिने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यानंतर चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तिच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. सायली संजीव प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. तिचे नाव भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्यासोबत नेहमी जोडले जाते. सायलीने अनेकदा त्यांच्या नात्यावर स्पष्टीकरण दिले आहे. आताही तसंच काहीसं घडलं आहे. सायलीने नुकतेच अभिनेता सुव्रत जोशीसोबत फोटो शेअर केला. पण या फोटोला दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सायली सुव्रत सोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, 'कुठलीही गोष्ट हॅट्रिकला आली की भारी वाटतं आणि टेन्शन पण येतं! आज आम्ही एकत्र आमच्या तिसऱ्या प्रोजेक्टला सुरुवात केली. यावेळी पुर्णपणे नवे पिच,नवीन संघ आणि नवीन आव्हान...दोन फलंदाज तेच. आता या बॉलला सिक्सर बसेल की विकेट निघेल माहीत नाही पण आम्ही फुल फोकोस आहोत.'
सायलीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला. सायलीने या पोस्टमध्ये क्रिकेटचे उदाहरण दिले आहे. त्यामुळे ही पोस्ट वाचून चाहत्यांना लगेच ऋतुराज गायकवाड आठवला. त्यांनी अशाच कमेंट्स तिच्या या पोस्टवर केल्या आहेत. सायलीच्या या पोस्टवर 'कसं एकदम जमतंय... आता उदाहरण पण क्रिकेटचीच का', 'आम्ही विकेट पडुच देणार नाही !', 'टेक्निक चांगली आहे तुमची ,जरा यॉर्कर नीट खेळा फक्त ऋतु...ज सारका नीट बघून खेळा मग' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
ऋतुराज गायकवाड याने सायलीच्या एका इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट केली होती. तेव्हापासूनच ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र आमच्यामध्ये काहीही नसल्याचे सायलीने स्पष्ट केले आहे. एका मुलाखतीत सायली म्हणाली होती की, 'तो 'काहे दिया परदेस' मालिकेचा फॅन होता. मलाही आश्चर्य वाटलं होतं, पण माझ्यापेक्षा तो खूपच लहान आहे, असे म्हणत सायलीने या चर्चेला पूर्णविराम लावले होते.