सोशल मीडियावर सायली संजीवचे नववधूप्रमाणे नटलेले फोटो व्हायरल,पाहून हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 13:05 IST2021-04-05T13:04:54+5:302021-04-05T13:05:27+5:30
सायलीनं चित्रपटांमध्ये मात्र वैविध्यपूर्ण भूमिका साकरण्यावर भर दिला आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेल्या सायलीनं प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची भूमिका साकारली. झिम्मामध्येही ती एक वेगळ्या धाटणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोशल मीडियावर सायली संजीवचे नववधूप्रमाणे नटलेले फोटो व्हायरल,पाहून हटणार नाही नजर
'काहे दिया परदेस' या मालिकेतून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री सायली संजीवचे देशभरात असंख्य चाहते आहेत. मराठी मालिकांनंतर सायली मराठी चित्रपटांध्येही यशस्वी पदार्पण केलं. लवकरच ती झिम्मा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आणि त्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षा सायलीच्या नावाचीच सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरू आहे.
सायलीनं चित्रपटांमध्ये मात्र वैविध्यपूर्ण भूमिका साकरण्यावर भर दिला आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेल्या सायलीनं प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची भूमिका साकारली. झिम्मामध्येही ती एक वेगळ्या धाटणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सायली संजीव सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधत असते. यानिमित्ताने आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी रसिकांना मिळते. मात्र सोशल मीडियावरील तिचे काही फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमध्ये सायलीचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या सायलीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. लेंहग्यामध्ये सायलीचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. सायालीचाहा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून चाहत्यांच्याही फोटोंवरून नजर हटणार नाही असाच तिचा अंदाज या फोटोत पाहायला मिळत आहे.तसेच लग्नाच्या बातम्यांवर सध्या तरी लग्नाचा विचारही मनात नसल्याचे तिने स्पष्ट केले होते.