पाहा... भाऊ कदमचा मजेशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2017 11:37 AM2017-01-08T11:37:34+5:302017-01-09T12:44:18+5:30

प्रेक्षकांना खळखळून हसविणारे कलाकार पडदयामागेदेखील तितकेच मस्तीखोर आणि मज्जा करत असतील का हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. मात्र प्रेक्षकांच्या याच प्रश्नाचे उत्तर नुकतेच प्रेक्षकांचा लाडका कलाकार कुशल बद्रिके याने दिले आहे. कुशलने नुकताच सोशलमीडियावर एक मजेशीर व्हिडीओ अपडेट केला आहे.

See ... Brother's step-by-step funny video | पाहा... भाऊ कदमचा मजेशीर व्हिडीओ

पाहा... भाऊ कदमचा मजेशीर व्हिडीओ

googlenewsNext
रेक्षकांना कलाकारांच्या पडदयामागच्या गोष्टी जाणून घेण्यात खूप रस असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आवडत्या कलाकाराची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यात उत्सुक असते. त्यात जर प्रेक्षकांना खळखळून हसविणारे कलाकार पडदयामागेदेखील तितकेच मस्तीखोर आणि मज्जा करत असतील का हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. मात्र प्रेक्षकांच्या याच प्रश्नाचे उत्तर नुकतेच प्रेक्षकांचा लाडका कलाकार कुशल बद्रिके याने दिले आहे. कुशलने नुकताच सोशलमीडियावर  एक  मजेशीर व्हिडीओ अपडेट केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ नक्कीच बघा अशी पोस्टदेखील कुशलने केली आहे. या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांना खळखळू हसविणारे  भाऊ कदम गाणं गाताना दिसत आहे. पण हे गाणं इतर गाण्यांपेक्षा वेगळं आहे. २००० च्या नोटेवर हे गाणं रचण्यात आले आहे. जुन्या गाणाची चाली पण त्यावर बोल आपलेच असे काहीसे करत भाऊने हे गाणे गायले आहे. आली माज्या घरी ही दिवाळी या मुळ गाण्याच्या चालीवर त्याने हे २००० च्या नोटेचे गाणे रचले आहे आणि गायलेही आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशलमीडियावरदेखील मनोरंजन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या व्हिडीओला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच भाऊ एक नंबर असा कमेंन्टदेखील मिळत आहे. भाऊंची ही अभिनयाबरोबर गायनाची आवडदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळाले. भाऊ कदम सध्या चला हवा येऊ दया या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर त्यांचा नुकताच झाला बोभाटा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

Web Title: See ... Brother's step-by-step funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.