पाहा ओम पुरींचा हा मराठमोळया रुपातील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 01:42 PM2017-01-06T13:42:50+5:302017-01-06T13:42:50+5:30
ओम पुरी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली होती हे फार कमी लोकांना माहित असेल. घाशीराम कोतवाल या ...
ओ पुरी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली होती हे फार कमी लोकांना माहित असेल. घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटातील ओम पुरी यांचा एक फोटो सध्या सोशलसाईट्सवर व्हायरल होत आहे. ओम पुरींच्या अचानक जाण्याने सध्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ओम पुरी यांच्या करिअरविषयी, त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सध्या जास्त बोलले जात आहे. परंतू बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटविलेल्या या महान कलाकाराने त्याच्या करिअरची सुरुवातच मराठी सिनेमातून केल्याचे आता समोर आले आहे. ओम पुरी यांचा पगडी आणि सदरा घातलेला अस्सल मराठमोळा लुक समोर आला आहे. मराठी रंगभूमीवर ह्यघाशीराम कोतवालह्ण हे नाटक अजरामर ठरले. परंतु, या चित्रपटाची मात्र तेवढी चर्चा झाली नाही. पुण्याच्या फिल्म इन्स्टिटूटच्या काही माजी विद्यार्थ्यांनी १९७६ मध्ये एकत्र येऊन ह्ययुक्त को-आॅपरेटिव्ह सोसायटी स्थापन करून एका राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेऊन घाशीराम कोतवाल नाटकावर एक अत्यंत अनाकलनीय असंगत असा पूर्ण वेळेचा चित्रपट तयार केला. पटकथा तेंडुलकरांचीच होती. त्यात मोहन आगाशे नाना आणि घाशीरामच्या भूमिकेत ओम पुरी होते. या चित्रपटाला कुणी एक असा दिग्दर्शक नव्हता. पण नंतर चित्रपटातून गाजलेले मणी कौल, सद मिर्झा, के. हरिहरन, कमल स्वरूप असे ३-४ दिग्दर्शकीय भूमिकेत होते. कलाकृती कुणा एकाची नाही तर सर्जनात्मक सहकाराने चित्रपट निर्माण करायचा अशी या युक्त चमूची संकल्पना होती. हा चित्रपट बर्लिनला १९७६ साली यूथ फोरममध्येही दाखवला गेला होता. पण त्याची फारशी कोणी तिकडे दाखल नाही घेतली. १९७२ मध्ये ते आले आणि त्यानंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधींची आणीबाणी आली. त्या काळी बंडखोर नाटक म्हणून ते बरेच वादग्रस्त ठरले. मात्र, या नाटकाला पुणेकरांनी उचलून धरले, तर मुंबईत तीव्र विरोध झाला. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, जपानमध्येही त्याचे प्रयोग झाले.