हे पाहा, मृण्मयी देशपांडेच्या मेहंदीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2016 03:12 PM2016-12-02T15:12:50+5:302016-12-02T15:16:35+5:30

प्रत्येकाला कलाकारांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची प्रचंड इच्छा असते. त्यामध्ये जर फेव्हरेट कलाकार असेल तर यामध्ये काही शंकाच नसते. त्याचबरोबर ...

See, pictures of Mehndi of Mrinalini Deshpande | हे पाहा, मृण्मयी देशपांडेच्या मेहंदीचे फोटो

हे पाहा, मृण्मयी देशपांडेच्या मेहंदीचे फोटो

googlenewsNext
रत्येकाला कलाकारांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची प्रचंड इच्छा असते. त्यामध्ये जर फेव्हरेट कलाकार असेल तर यामध्ये काही शंकाच नसते. त्याचबरोबर त्यांचे लग्नसोहळे असतील तर चाहते मात्र अधिक उत्सुक असल्याचे पाहायला मिळतात. मात्र अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या चाहत्यांसाठी  एक आनंदाची बातमी आहे. मृण्मयी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या जीवनसाथीचे नाव स्वप्नील राव असे आहे. मृण्यमयीचा मेहंदी व हळदीचा कार्यक्रम झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नुकतेच तिने फेसबुकवर मेहंदीचे काही फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये मृण्मयी आणि स्वप्नील खूपच सुंदर दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटो पाहता, नवरी नटली असेच म्हणावे वाटते. तिच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरून पसंती दिले असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर तिला सोशल मीडियावर चाहत्यांच्यावतीने खूपसाºया शुभेच्छा मिळत असल्याचेदेखील दिसत आहेत. तसेच आता मराठी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ एक विवाह बंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये सनई चौघडे वाजण्यास सुरू झाल्याचे दिसत आहेत. मृण्मयीने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तसेच ती सध्या कॉमेडीची बुलेट ट्रेन या मालिकेत सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडत आहे. तसेच ती अभिनेता भूषण प्रधानसोबत आगामी चित्रपटातदेखील झळकणार आहे. यापूर्वी तिने मामाच्या गावाला जाऊ या, नटसम्राट, कटयार काळजात घुसली, अनुराग असे अनेक एक से एक चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. तसेच ती अग्निहोत्र, कुंकु या मालिकेतूनदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. 





Web Title: See, pictures of Mehndi of Mrinalini Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.