पाहा काय आहे वज्र चित्रपटाची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2017 12:37 PM2017-01-12T12:37:13+5:302017-01-12T12:37:13+5:30

वज्र हा चित्रपट एका हिऱ्या भोवती फिरणाऱ्या रहस्य कथेवर आधारित आहे. जगातील सर्वात महाग असणारा हा हिरा जगातील ५ ...

See what the story of Thunderbolt is | पाहा काय आहे वज्र चित्रपटाची कथा

पाहा काय आहे वज्र चित्रपटाची कथा

googlenewsNext
्र हा चित्रपट एका हिऱ्या भोवती फिरणाऱ्या रहस्य कथेवर आधारित आहे. जगातील सर्वात महाग असणारा हा हिरा जगातील ५ धनाढ्य व्यक्तीच्या मालकीचा असतो. ५ पैकी एक अचानक नाहीसा झाल्यावर व कुठलेच धागे दोरे मिळत नसल्याने सी बी आय कडे तपास सोपवला जातो. सी बी आय मधील एक अत्यंत चतुर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुन्हे सहज सोडवणारा भूषण याच्या कौशल्यपूर्ण तपासकार्याची व मनोरंजनाने भरगच्च अशी ही चित्रपटकथा आहे. सॅम हा देश विदेशात सहज वावरणारा आणि हिरे चोरणारा अत्यंत सराईत असा गुन्हेगार असतो. सॅम ह्या हिऱ्याच्या चोरीसाठी प्रयत्नशील असतो. सॅम आणि सॅम चा लहान मुलगा हे सुद्धा आता नवीन पद्धतीने चोरी करू लागल्याने ते पोलिसांना गुंगारा देत असतात. भूषण आणि सी बी आय चे मुख्य अधिकारी हरदास यांच्या संशोधन कौशल्याने सॅम कसा जाळ्यात अडकतो हे हॉलीवूड च्या चित्रीकरणाच्या पद्धतीने या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मानसी नाईक यांनी “रहमत खुदा की, कयामत है ये अल्ला”  या मुजऱ्यावर केलेले दिलखेचक नृत्य आणि पॅरीस, जर्मनी येथील चित्रीकरण या चित्रपटाचे विशेष आकर्षण. परिपूर्ण मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळणार आहे. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक मयूर करंबळीकर सांगतात, हा माझा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण करताना खूप मजा आली. पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत गुप्तहेराची कथा घेऊन काहीतरी वेगळा करण्याचा प्ऱयत्न केला आहे. आमची संपूर्ण नवीन आणि तरूण टीम आहे. आम्ही सवार्नी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे काही चित्रिकरण परदेशातदेखील झाले आहे. तसेच माज्या पहिल्या साकव चित्रपटाला कोल्हापूर आंतरराष्ट्रीय महोत्सवमध्ये नामांकन मिळाले आहे. त्यामुळे वज्र हा चित्रपटदेखील असे यश मिळवेन अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना १३ जानेवारीपर्यत वाट पाहावी लागणार आहे. 

Web Title: See what the story of Thunderbolt is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.