पाहा कोण आहे अनुजाचे क्रश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 12:12 PM2017-01-03T12:12:16+5:302017-01-03T12:12:16+5:30
अभिनेत्री अनुजा साठेने मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात स्वत:च्या अभिनयाची छाप तर उमटविलीच आहे. मराठीच काय तर सध्या अनुजा ...
अ िनेत्री अनुजा साठेने मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात स्वत:च्या अभिनयाची छाप तर उमटविलीच आहे. मराठीच काय तर सध्या अनुजा हिंदी मालिकेत देखील प्रेक्षकांना दमदार भूमिकेत पाहायला मिळतेय. बाजीराव मस्तानी सारख्या भव्य-दिव्य चित्रपटात अनुजाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखविलीच होती. परंतू सौरभ गोखले सोबत सुखाने संसार करणाºया अनुजाचे पहिले प्रेम कोण आहे हे तुम्हाला माहितीय का? अनुजाचे पहिले प्रेम म्हणजेच तिचे फर्स्ट क्रश आहे हॉलिवूडचा अभिनेता टॉम क्रुझ. बरं अनुजाला काही फक्त टॉमच आवडत नव्हता, तर या पठ्ठीला बॉलिवूडचा बादशहा शाहरुखने देखील भूरळ पाडली होती. याविषयी अनुजा सांगते, माझा लहानपणापासूनचा क्रश हा शाहरुख खान आहे. तो मला भयंकर आवडतो, माझा दुसरा क्रश म्हणजे टॉम क्रूझ. लहानपणापासूनच मला हे दोन्ही अभिनेते आवडतात. पण केवळ ते अभिनेते आहेत म्हणून नाही तर अगदी मनापासून ते मला आवडतात. शाळेत असताना मी माझ्या स्वत:च्या रुममध्ये टॉम क्रझूची साधारण किंग साइज तीन पोस्टर्स होते. माझ्या भावाने मला दोन वाढदिवसाला सलग दोन वर्ष टॉम क्रूझचे किंग साइज पोस्टर्स गिफ्ट म्हणून दिले होते. कारण मला तो खूप आवडतो. त्याचा टॉपगन चित्रपट आला तेव्हा मी अगदीच लहान होते. तेव्हापासून ते आतापर्यंत माझं त्याच्यावर असलेलं प्रेम जसच्या तसं आहे आणि त्यात काहीच बदल झालेला नाही. शाहरुखच्या बाबतीत असचं होतं. वृत्तपत्र किंवा मासिकांमध्ये आलेले त्याचे फोटोंची कात्रण काढून मी रुममध्ये लावायचे. माझी अख्खीच्या अख्खी रुम टॉम क्रूझ आणि शाहरुखच्या फोटोंनी भरलेली होती. मी साधारण आठवी-नववीत जाईपर्यंत माज्या रुममध्ये त्यांचे फोटो तसेच लावलेले होते. शाहरुख नोबडी पासून समबडी बनला. कोणाचाही वरदहस्त नसताना तो इतका मोठा सेलिब्रिटी झाला. त्यामुळेच तो माझ्यासाठी एक आयडल क्रश आहे.