" अभिनयाची जाण असलेली शालीन नटी..," सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 12:36 PM2023-08-24T12:36:53+5:302023-08-24T13:09:09+5:30
सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी विश्वातून अनेकांनी हळहळ व्यक्त केलीय. याचदरम्यान अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ यांनी सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अशोक सराफ यांनी वाहिली श्रद्धांजली
त्यांनी पहिल्या भूमिकेपासून आपलं नाव केलं होतं, अभिनयाची जाण असलेली शालीन नटी गेली. त्यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली, मला तर त्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या, अशा शब्दांत अशोक सराफ यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी ८० हून जास्त मराठी आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. काही कालावधीनंतर त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे बंद करून केवळ मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. २०
सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. १९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटादतून त्यांनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले. 'आनंद' या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.