'इफ्फी'तील फिल्म बाजारसाठी तीन मराठी चित्रपटांची निवड! सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 08:06 PM2023-11-02T20:06:34+5:302023-11-02T20:07:26+5:30

दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाजार' या विभागात महाराष्ट्र शासनाकडून मराठी चित्रपट पाठवले जातात.

Selection of three Marathi films for the film market in 'iffi'! Announcement by Sudhir Mungantiwar | 'इफ्फी'तील फिल्म बाजारसाठी तीन मराठी चित्रपटांची निवड! सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

'इफ्फी'तील फिल्म बाजारसाठी तीन मराठी चित्रपटांची निवड! सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई - यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून 'ग्लोबल आडगाव', 'गिरकी' आणि 'बटरफ्लाय' या तीन मराठी चित्रपटांची निवड केल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाजार' या विभागात महाराष्ट्र शासनाकडून मराठी चित्रपट पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार 'ग्लोबल आडगाव', 'गिरकी' आणि 'बटरफ्लाय' हे तीन चित्रपट निवडण्यात आले आहेत. या तीनही चित्रपटाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी शासनातर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागासाठी सहभागी होण्याकरता चित्रपटांसोबत पाठविण्यात येणार आहे. 

शासनाने महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जाहिरातीद्वारे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म बाजार' या विभागात राज्य सरकारकडून पाठविण्याकरीता इच्छुक चित्रपटांचे प्रवेश मागविले होते. त्यानुसार एकूण २९ चित्रपटांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. किशोरी शहाणे,  प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठल्ये आणि संदीप पाटील यांच्या समितीने परीक्षणाअंती तीन चित्रपटांची निवड केली.

Web Title: Selection of three Marathi films for the film market in 'iffi'! Announcement by Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.