ज्येष्ठ अभिनेते माहिमकरांना अश्रू अनावर, अंकिताने दाखवली परिस्थिती, 'इच्छामरणाचाही अर्ज...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 02:10 PM2023-07-12T14:10:08+5:302023-07-12T14:13:10+5:30

मनमोहन माहिमकर यांना अनेक मराठी मालिका, सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल.

Senior actor Manmohan Mahimkar was left in tears Ankita walawalkar showed the situation | ज्येष्ठ अभिनेते माहिमकरांना अश्रू अनावर, अंकिताने दाखवली परिस्थिती, 'इच्छामरणाचाही अर्ज...'

ज्येष्ठ अभिनेते माहिमकरांना अश्रू अनावर, अंकिताने दाखवली परिस्थिती, 'इच्छामरणाचाही अर्ज...'

googlenewsNext

'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' सारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर (Manmohan Mahimkar) आठवतात का? दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) माहिमकर काकांसोबतचा व्हिडिओ शेअर केला होता. मनमोहन माहिमकर हे एकटेच असून त्यांना कामाची गरज आहे. पैशांसाठीच नाही तर वेळ जावा म्हणूनही ते काम मिळवण्यासाठी या वयातही धडपडत आहेत. त्यांची हीच परिस्थिती अंकिताने व्हिडिओतून मांडली होती. आता माहिमकर काकांना अक्षरश: रडू कोसळलं असून अंकिताने पुन्हा त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

अंकिता नुकतीच मनमोहन माहिमकर यांच्या घरी जाऊन आली. त्यांनी इच्छामरणासाठी केलेला अर्ज तिने दाखवला. तसंच असा अर्ज वगरे आपल्याला करायचा नाही, तुम्हाला नक्की काम मिळणार असं म्हणत तिने त्यांना धीर दिला. माहिमकर काकांनी तिला त्यांचे जुने लेख, इतर कागदपत्रही दाखवली. तिने व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्या घरातील सर्व परिस्थिती दाखवली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही वेळेतच व्हायरल झालाय. मनमोहन माहिमकर यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी लग्न केलं नाही. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी कुटुंबही नाही. आयुष्यात खूप एकटेपणा आलाय. हाताला कामही नाही म्हणून त्यांनी थेट इच्छामरणासाठीही अर्ज केला. आता हा व्हिडिओ पाहून तरी इंडस्ट्रीतील कोणी त्यांच्या मदतीला धावून येतं का हे बघणं महत्वाचं आहे.

Web Title: Senior actor Manmohan Mahimkar was left in tears Ankita walawalkar showed the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.