ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक यांच निधन, वयाच्या 65 वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:16 PM2020-06-15T12:16:15+5:302020-06-15T12:20:10+5:30

१९८९ मध्ये स्मिता तळवळकर यांनी चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला आणि दिग्दर्शनाची सर्व सूत्रे कांचन नायक यांच्या हाती सोपवली.

Senior director Kanchan Nayak passes away | ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक यांच निधन, वयाच्या 65 वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक यांच निधन, वयाच्या 65 वर्षी घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext

भावनात्मक कथा हाताळणारा दिग्दर्शक कांचन नायक यांचे निधन झाले आहे.  राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. कांचन नायक यांनी २००१ साली ‘राजू’ या सिनेमास्कोप संगीतमय चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाने रौप्यमहोत्सवाबरोबर राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या तिसर्‍या पारितोषिकासह एकूण सात पारितोषिके पटकावली.

भावनाप्रधान चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणार्‍या कांचन नायक यांनी भोजपुरी भाषेतला ‘पिंजडेवाली मुनिया’ व ‘डंक्यावर डंका’ असे विनोदी विषयही चित्रपटाचे दिग्दर्शन करताना लीलया हाताळले. शं.ना. नवरे यांच्या कथेवर केलेली टेलिफिल्म ‘त्या तिथे पलीकडे’ हा नर्मविनोदाचा एक उत्तम नमुना आहे. २००८ साली प्रसिद्ध दाक्षिणात्य निर्माते डी. रामनायडू यांच्या ‘माझी आई’ या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. २०१३ मध्ये त्यांनी ‘दणक्यावर दणका’ या विनोदी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले.

दरम्यान १९८९ मध्ये स्मिता तळवळकर यांनी चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला आणि दिग्दर्शनाची सर्व सूत्रे कांचन नायक यांच्या हाती सोपवली. त्यातून ‘कळत नकळत’ हा चित्रपट आकाराला आला. कौटुंबिक जीवनातले भावनात्मक ताणतणाव व त्यांची हळुवार पद्धतीने केलेली उकल असा आशय असलेला हा चित्रपट त्यातल्या एकूणच बांधणीमुळे रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे.
 

Web Title: Senior director Kanchan Nayak passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.