बड्या सिगिंग रिअॅलिटी शोची विजेती असणारी मराठमोळी गायिका म्हणते काम देता का कुणी काम?,बॉलिवूडच्या संगीतकार आणि निर्मात्यांवरही केले धक्कादायक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 09:11 AM2018-01-23T09:11:49+5:302018-01-23T14:41:49+5:30
रिअॅलिटी शोमधून अनेक गायक गायिका प्रसिद्धीच्या झोतात येतात.शोमधील कामगिरी म्हणा किंवा त्यांच्यातल्या टॅलेंटमुळे त्यांना गायनाच्या चित्रपटसृष्टीत ब-याच ऑफर मिळतात. ...
र अॅलिटी शोमधून अनेक गायक गायिका प्रसिद्धीच्या झोतात येतात.शोमधील कामगिरी म्हणा किंवा त्यांच्यातल्या टॅलेंटमुळे त्यांना गायनाच्या चित्रपटसृष्टीत ब-याच ऑफर मिळतात. मात्र काही हिट गाणी दिल्यानंतर हे गायक गायिका अचानक गायब होतात.सिनेमात त्यांच्या सूरांची जादू दिसत नाही.फार फार तर कॉन्सर्ट आणि शोमध्ये ते पाहायला मिळतात. असंच काहीसं गायिका संजीवनी भेलांडेबाबत घडलंय.'सा रे गा मा पा' या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनची विजेती असलेली गायिका म्हणजे संजीवनी.या शोमधील गायकीमुळे संजीवनीला बॉलिवूडमध्ये विविध संधी मिळाल्या. ए. आर.रेहमान, हिमेश रेशमिया अशा बॉलिवूडच्या दिग्गजांसह कामाची तिला संधी लाभली. करीब सिनेमातील 'चोरी-चोरी जब नजरें मिली' आणि 'चुरा लो ना दिल मेरा सनम' यांसारख्या सूरेल गाण्यांनी त्यांनी रसिकांची मनं जिंकली.याशिवाय 'क्या दिल ने कहा' सिनेमातील 'निकम्मा किया इस दिल ने' हे गाणेही गायले. मात्र सध्या संजीवनी प्रसिद्धी किंबहुना बॉलिवूडपासून दूर आहे.भक्तीगीतं गाताना आणि कॉन्सर्टमध्ये संजीवनी पाहायला मिळते.सध्या सिनेसृष्टीतून गायनाबद्दल विचारणा होत नसल्याची तिला खंत वाटते. इतकंच नाही तर फिल्ममेकर्स विसरले असावेत अशी नाराजीही तिने व्यक्त केली आहे.सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल यांच्यासारख्या गायिकांना विचारत घेऊन गाणी बनतात मग आपला विचार का होत नाही असा प्रश्नही संजीवनी बॉलिवूडला विचारत आहे.याशिवाय आपल्या गायनात संगीतकार आणि निर्माते कायम हस्तक्षेप करायचे असेही तिने म्हटले आहे. गायनाची शैली शास्त्रीय गायकीप्रमाणे असल्याने ती कुणाला रुचणार नाही असंही निर्माते आणि संगीतकारांनी म्हटल्याचा खुलासा संजीवनीने केला आहे. आजही लगा जा गले', 'लागा चुनरी में दाग' अशी गाणी रसिकांच्या ओठावर रुंझी घालतात, मग तुम्ही असं कसं म्हणू शकता असा सवालही तिने निर्माते आणि संगीतकारांना विचारला आहे.संजीवनीने सिनेमा गीतांसह शेकडो भक्तीगीतं आणि धार्मिक गाणी गायलीत. हनुमान चालीसा, कृष्ण भजन आणि आरत्यांचा समावेश आहे.याशिवाय तिने अनेक प्रादेशिक गाणीही गायली आहेत.तिचे पुस्तक 'मीरा एंड मी'मध्ये मीराबाई यांच्या अनेक कविता इंग्रजीत भाषांतरीत केलेल्या आहेत.संजीवनीला सध्याच्या गायकांपैकी अरिजीत सिंग भावतो. त्याने गायलेले 'लाल इश्क' (गोलियों की रासलीला राम-लीला) 'आयत' (बाजीराव मस्तानी) ही गाणी आवडतात असंही तिने म्हटलं आहे. कॉन्सर्टमध्येही ही गाणे आवर्जून गात असल्याचे तिने सांगितले आहे.सोनम कपूरसाठी काही गाण्यांच्या लाईन्स गायल्या असून लवकरच सिनेसृष्टीत पुन्हा गायनाची संधी मिळेल अशी तिला आशा आहे.