'शाळा' सिनेमातील बालकलाकार अंशुमन जोशी आता दिसतो खूप हॅण्डसम, पहा त्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 12:45 PM2019-12-07T12:45:39+5:302019-12-07T12:46:17+5:30

अंशुमनने शाळा चित्रपटात मुकुंद जोशीची भूमिका साकारली होती.  सोशल मीडियावरील त्याचे फोटो पाहून आता त्याला ओळखणे कठीण जात आहे.

Shala Movie Fame Anshuman Vichare now looking very handsome, see his photos | 'शाळा' सिनेमातील बालकलाकार अंशुमन जोशी आता दिसतो खूप हॅण्डसम, पहा त्याचे फोटो

'शाळा' सिनेमातील बालकलाकार अंशुमन जोशी आता दिसतो खूप हॅण्डसम, पहा त्याचे फोटो

googlenewsNext


सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा' चित्रपटाने रसिकवर्गाच्या शाळेच्या आठवणींना तर उजाळा दिला. त्याशिवाय या चित्रपटाने रसिकांच्या मनात घर केलं. या चित्रपटात बालकलाकार अंशुमन जोशी व केतकी माटेगावकर यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती. या चित्रपटानंतर केतकी बऱ्याच सिनेमात झळकली. मात्र अंशुमन जोशी फारसा सिनेसृष्टीत काम करताना दिसला नाही.


अंशुमनने शाळा चित्रपटात मुकुंद जोशीची भूमिका साकारली होती.  सोशल मीडियावरील त्याचे फोटो पाहून आता त्याला ओळखणे कठीण जात आहे. आता तो खूपच हॅण्डसम दिसतो आहे.

'शाळा'मध्ये त्याने साकारलेलं अल्लड वयातलं प्रेम आजही त्याच्या अभिनय क्षमतेची आठवण करून देतो. अंशुमन जोशी या मूळच्या सोलापूरकर मुलाने शाळेतलं अवघं विश्वच आपल्यासमोर उभं केलं. मिलिंद बोकिल यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.

सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. दमदार अभिनयासाठी अंशुमनलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.


शाळा चित्रपटानंतर सुद्धा त्याने काही चित्रपटांत काम केले आहे. 'म्हैस'(२०१२), 'फुंतरू'(२०१६), 'फास्टर फेणे'(२०१७) यासारख्या मोजक्या मराठी चित्रपटांत त्याने काम केलेले आहे.

‘शाळा’नंतर अंशुमन ‘फोटोकॉपी’मध्ये एका वेगळ्याच अंदाजात दिसला.

मराठी शिवाय अंशुमनने इरफान खान, मिथिला पालकर व दलकीर सलमान यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट कारवांमध्येदेखील काम केलं आहे.

Web Title: Shala Movie Fame Anshuman Vichare now looking very handsome, see his photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.