'फॅण्ड्री'मधल्या शालूला लागली लॉटरी, राजेश्वरी खरातची मराठी सिनेइंडस्ट्रीनंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 07:00 AM2021-12-01T07:00:00+5:302021-12-01T07:00:00+5:30

नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहचली.

Shalu from 'Fandry' won the lottery, Rajeshwari Kharat's entry in Bollywood after Marathi Cineindustry | 'फॅण्ड्री'मधल्या शालूला लागली लॉटरी, राजेश्वरी खरातची मराठी सिनेइंडस्ट्रीनंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री

'फॅण्ड्री'मधल्या शालूला लागली लॉटरी, राजेश्वरी खरातची मराठी सिनेइंडस्ट्रीनंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री

googlenewsNext

नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. 'फॅण्ड्री' चित्रपटात राजेश्वरीने शालूची भूमिका साकारली होती. चित्रपटात शाळकरी मुलीची भूमिका साकारणारी राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. राजेश्वरी खरातला बॉलिवूडची लॉटरी लागली आहे. 

"पुणे टू गोवा" चित्रपटातून राजश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राजश्रीने फँड्री, आयटमगिरी अशा मराठी चित्रपटातून अभिनय केला होता. अमोल भगत दिग्दर्शित "पुणे टू गोवा" या चित्रपटात राजश्री दिसणार आहे. याच बरोबर आदित्यराजे मराठे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली असून हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, आणि ॲक्शन रसिकांना पाहता येणार आहे.


पुणे टू गोवा हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणार्‍या कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे, पण या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणार्‍या धोकादायक परिस्थितींवर प्रकाश टाकण्यात आला आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत यांनी दिली.
पुणे टू गोवा चित्रपटातील राजेश्वरीच्या भूमिकेबद्दल अद्याप काही समजलेले नाही. मात्र तिचे चाहते हिंदीच्या रुपेरी पडद्यावर तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

Web Title: Shalu from 'Fandry' won the lottery, Rajeshwari Kharat's entry in Bollywood after Marathi Cineindustry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.