शामक दावरचे मराठीमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 05:13 AM2017-01-31T05:13:08+5:302017-01-31T13:15:32+5:30
अभिनेता, संगीतकार, गायक यांच्यापाठोपाठ आता बॉलिवुड कोरियोग्राफर यांनादेखील मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा मोह आवरला नाही. आता हेच पाहा ना, बॉलिवुडचा ...
अ िनेता, संगीतकार, गायक यांच्यापाठोपाठ आता बॉलिवुड कोरियोग्राफर यांनादेखील मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा मोह आवरला नाही. आता हेच पाहा ना, बॉलिवुडचा तगडा कोरियोग्राफर शामक दावरदेखील मराठीमध्ये पदार्पण करत आहे. तो हृद्यांतर या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीसृष्टीत पाऊल टाकत आहे. या चित्रपटासाठी त्यांनी खास कोरियोग्राफी केली आहे. हा चित्रपट दिग्दर्शक विक्रम फडनीस यांचा आहे. या चित्रपटाची चर्चा मुहुर्तापासून सुरू आहे. या चित्रपटाच्या मुहुर्तावेळीदेखील बॉलिवुडचा किंग खान शाहरूख खान उपस्थित होता. तसेच चित्रपटाचा दिग्दर्शकदेखील बॉलिवुडचा तगडा फॅशन डिझायनर असल्याने या चित्रपटाला जास्त बॉलिवुड टच असणार आहे यात शंकाच नाही.
शामकच्या या कोरियोग्राफीविषयी दिग्दर्शक विक्रम फडनीस सांगतात, गेल्या २५ वर्षांपासून शामक यांना मी ओळखतो. आमचे एकमेकांशी खूप चांगले संबंध असल्यामुळे त्यांच्याबरोबर एकदा तरी काम करणयाची इच्छा होती. १० वर्षांपूर्वी मला एक मराठी चित्रपटाचा करायचा होता. काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी प्रयत्न देखील करत होतो. त्यावेळी शामक दावर मला म्हणाले होते की, तुज्या प्रोजेक्टमध्ये माझा तुला पूर्णपणे पाठिंबा असेल. बघता बघता ते स्वप्न वास्तवात उतरलं, मी आणि शामक दावर सर ब-याच कालावधी नंतर एकत्र काम करत आहे. तसेच शूटच्या दिवशी ज्यावेळी शामक दावर सेटवर आले तेव्हा त्यांनी विक्रम फडनीसांना नटराजाची मूर्ती गिफ्ट म्हणून दिली, एका कलाकाराला याहून मोठी आनंदाची बाब काय असू शकते.
विक्रम फडनीस प्रॉडक्शन, यंग बेरी एंटरट्नमेंट प्रस्तुत हृद्यांतर हा एक भावनात्मक असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे झळकणार आहेत. तसेच या चित्रपटात सोनाली खरे, मीना नाईक आदी कलाकारांचादेखील समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. नुकताच या चित्रपटाच्या टीमने एक भाग मुंबईत शूट केला आहे.