शंकर महादेवन म्हणतायेत ‘वेगे वेगे धावू’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 07:36 AM2018-03-07T07:36:23+5:302018-03-07T13:06:23+5:30
छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिले तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चालेली असते हे नक्की कळू शकेल. मुलांच्या विश्वात ...
छ ट्यांच्या विश्वात डोकावून पहिले तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चालेली असते हे नक्की कळू शकेल. मुलांच्या विश्वात रमताना आपणही लहान होतो. छोट्यांच्या दुनियेत घेऊन जात त्यांच्या मनातील विश्व गायक–संगीतकार शंकर महादेवन उलगडून दाखवणार आहेत. मुलांशी संवाद साधत त्यांच्या बालविश्वात घेऊन जाणारे सुमधुर गीत नुकतेच शंकर महादेवन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले. योगायतन फिल्मसच्या आगामी परी हूँ मैं या चित्रपटातील हे गीत अभिषेक खणकर यांच्या लेखणीतून साकारले असून संगीतकार समीर साप्तीस्कर यांचा सुरेख संगीत साज या गीताला लाभला आहे.
करूया किलबिल चिऊ काऊ सवे जरा... बोलकी बोबडी ...
चांद ताऱ्याची वाऱ्याची विणूया ना जरा मलमली... गोधडी...
वेगे वेगे धावू कुशीमध्ये घेऊ चांदव्यात लपला ससोबा जरासा....
असे बोल असलेल्या या गीतातून बालपणाची मौज, त्यातील निरागसता टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बालविश्वाची सुरेख सफर घडवणारे हे गीत प्रत्येकाला आपल्या बालपणाची आठवण करून देईल, असा विश्वास गायक शंकर महादेवन यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
जगण्याचा संघर्ष आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधत एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास परी हूँ मैं या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार परी हूँ मैं या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला राजेंद्र सिंह असून दिग्दर्शन रोहित शिलवंत यांचे आहे. या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर संजय गुजर हे आहेत.
परी हूँ मैं या चित्रपटाद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची कन्या जिया वाडकर पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. योगायतन फिल्मसची निर्मिती असलेल्या ‘परी हूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटासाठी जियाने गाणं गायले आहे. या चित्रपटातील ‘मोठ्या मोठ्या लाटांवरी आता तरी पोहू दे’... ‘चमचमणारी स्वप्न सारी आता खरी होऊ दे’... हे टायटल साँग जिया हिच्या सोबत मंदार पिळवलकर याच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.
Also Read : नंदू माधव झळकणार नवीन भूमिकेत,लवकरच 'परी हूँ मैं' रसिकांच्या भेटीला