शानचे मराठी संगीत दिग्दर्शनात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2016 01:33 AM2016-03-20T01:33:29+5:302016-03-19T18:33:29+5:30

हिंदीतील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टी आणखी एका कलाकाराला आपल्याकडे खुणावत आहे. हा कलाकार कोण? तर बॉलीवूडचा ...

Shan's debut in Marathi music direction | शानचे मराठी संगीत दिग्दर्शनात पदार्पण

शानचे मराठी संगीत दिग्दर्शनात पदार्पण

googlenewsNext
ंदीतील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टी आणखी एका कलाकाराला आपल्याकडे खुणावत आहे. हा कलाकार कोण? तर बॉलीवूडचा मेलोडियस गायक शान मुखर्जी आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. मिका सिंग, विशाल-शेखर, जावेद अली, सोनू निगम, अभिजित भट्टाचार्य, उषा उथ्थप, सुनीधी चौहान, श्रेया घोषाल आणि हरिहरन यानंतर रोमॅन्टिक गायक अशी ख्याती असलेला शांतनू मुखर्जी उर्फ शान याने मराठीत पदार्पण केले आहे.
वाळुमाफिया या समाजातील ज्वलंत विषयावर आधारित ‘रेती’ या चित्रपटाच्या निमित्ताने शानने मराठी चित्रपट संगीत दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे. याविषयी लोकमत ‘सीएनएक्स’ने शानशी संवाद साधला असता, त्याने चक्क मराठीतच बोलणे सोयीचे असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘मी संपूर्णपणे मुंबईकरच आहे. त्यामुळे मराठी भाषा मला लहानपणापासूनच येते. शाळेतही मराठीत मला सर्वाधिक मार्क्स मिळायचे.’
मराठी चित्रपटात संगीत दिग्दर्शन करण्याचे कसे काय ठरवले? हा अनुभव सांगताना तो म्हणाला, ‘माझा मित्र अभिषेक जावकर याने मला या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करण्यास सांगितले. मला आधी फारच टेन्शन आले. पण माझे सहकारी रोशन आणि गौरव या दोघांनीही मला आपण हे करूयाच, असे सांगितले. म्हणून आम्ही चित्रपटाची कथा ऐकण्याचे ठरवले. दिग्दर्शक सुहास भोसले, निर्माता प्रमोद गोरे, लेखक देवेन कापडनीस आणि गीतकार संजय पाटील यांना भेटलो. कथा ऐकल्यावर मला भीतीच वाटली. कारण मी आतापर्यंत केलेल्या रोमॅन्टिक जॉनरच्या अगदी विरुद्ध अशी कथा आहे. आपण कसे काय संगीत देऊ शकू असा प्रश्न मला पडला.’

लिरिक्स ऐकले आणि...
‘मी जेव्हा गाण्यांचे लिरिक्स ऐकले तेव्हा मला मराठी येत असल्याचा गैरसमज दूर झाला.’ हे बोलताना शानला हसू आवरले नाही. या चित्रपटातील गीतांचे शब्द इतके कठीण होते की त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी अनेक दिवस घालवायला लागले. संजयचे मराठी भाषेवरील प्रभुत्व बघून मी चकितच झालो.

 

Web Title: Shan's debut in Marathi music direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.