काही असतात, काही बनतात! व्हिलन बनणार शरद केळकर, 'या' तारखेला प्रदर्शित होणार 'रानटी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 05:01 PM2024-09-15T17:01:50+5:302024-09-15T17:02:48+5:30

शरद केळकरचा 'रानटी' हा नवा सिनेमा येतोय. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

Sharad Kelakar New Marathi Movie Raanti First Poster Out Releasing In Cinemas On 22 November 2024 | काही असतात, काही बनतात! व्हिलन बनणार शरद केळकर, 'या' तारखेला प्रदर्शित होणार 'रानटी'

काही असतात, काही बनतात! व्हिलन बनणार शरद केळकर, 'या' तारखेला प्रदर्शित होणार 'रानटी'

Sharad Kelkar New Movie : जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच 'रानटी' नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त 'रानटी' असतो. म्हणूनच म्हणतात की "काही 'रानटी' असतात,  काही बनतात!  असाच 'रानटी' बनलाय आपला लाडका अभिनेता शरद केळकर. 

शरद केळकरचा 'रानटी' (RAANTI) हा नवा सिनेमा येतोय. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरवरनं 'रानटी' चित्रपट दिसतोय, तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने  भरलेला असणार आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे 'रानटी' चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे 'सरप्राईज' असणार आहे.

सिनेमता शरदचा 'रानटीपणा' नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद म्हणाला, "अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्यातगड्या आणि जबरदस्त 'रानटी' चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे".


चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समित कक्कड ह्यांनी पार पाडलीये. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण, अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारा आणि सादर करण्याची कुवत दाखवणारा हा दिग्दर्शक आहे. श्वास रोखून ठेवणारा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटातून महाराष्ट्रातील न्यू 'अँग्री यंग मॅन' शरद केळकरच्या रूपाने मिळणार असल्याचे समित यांनी सांगितलं.

 समित कक्कड फिल्म्स प्रॉडक्शन्स आणि सन्स ऑफ साॅइल मीडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्‍या या चित्रपटाच्या निर्मीती पुनीत बालन यांनी केली आहे. या सिनेमासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.


आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, 'रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने एक चांगली टीम झाली आहे. दिग्दर्शक समित कक्कड याने नेहमीच आपल्यातील वेगळेपण दाखविला आहे. त्याच्या साथीने मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही 'रानटी' चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे. हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. चित्रपटाचं पोस्टर आणि चित्रपटाचं नाव यावरून 'रानटी'  प्रेक्षकांचं मनोरंजन करून पैसा वसुल करणार हे नक्की.  २२ नोव्हेंबरला हा चित्रपट आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.

Web Title: Sharad Kelakar New Marathi Movie Raanti First Poster Out Releasing In Cinemas On 22 November 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.