"मारायला हत्यार कशाला?"; शरद केळकरच्या 'रानटी'चा ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांचा भयंकर खलनायक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 02:03 PM2024-11-11T14:03:00+5:302024-11-11T14:03:40+5:30

शरद केळकरच्या आगामी 'रानटी' सिनेमाच्या जबरदस्त ट्रेलरनेे सर्वांचं लक्ष वेधलंय (sharad kelkar, raanti)

sharad Kelkar upcoming movie Raanti trailer release sanjay narvekar santosh juvekaer | "मारायला हत्यार कशाला?"; शरद केळकरच्या 'रानटी'चा ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांचा भयंकर खलनायक

"मारायला हत्यार कशाला?"; शरद केळकरच्या 'रानटी'चा ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांचा भयंकर खलनायक

मराठी मनोरंजन विश्वात सध्या एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाचं नाव म्हणजे 'रानटी'. शरद केळकरची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर रिलीज झाला. तेव्हापासूनच सिनेमाची इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा आहे. अखेर आज 'रानटी' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर लॉंच झाला. या ट्रेलरमध्ये शरद केळकर, संतोष जुवेकर आणि खलनायकाच्या भूमिकेत संजय नार्वेकर यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय. 

'रानटी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

समीत कक्कड दिग्दर्शित 'रानटी' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला दिसतं की संजय नार्वेकरसोबत जयवंत वाडकर बसलेले दिसतात. जयवंत वाडकरांच्या भोवती फटाक्याची मोठी माळ गुंडाळून ती पेटवली जाते. त्यामुळे जयवंत वाडकरांना मोठी जखम होते. त्यानंतर सिनेमात पाताळपुराची गोष्ट दिसते. जिथे कायद्याला थारा नसतो आणि गुंडांचा सुळसुळाट सुरु असतो. संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले हे कलाकार खलनायकी भूमिका साकारताना दिसतात. पाताळपुरातील गुंडांशी दोन हात करायला शरद केळकर सज्ज होते.


कधी रिलीज होणार 'रानटी'?

शरद केळकरचं नाव विष्णू असतं पण त्याला नरसिंह नावाने सर्व घाबरतात. शरद केळकरवर सर्व गुंड मिळून मोठं संकट आणतात. आता शरद या संकटातून कसा बाहेर पडतो? तो गुंडांचा कसा सामना करतो? याची कहाणी 'रानटी'च्या ट्रेलरमध्ये दिसते. समीत कक्कड यांनी ट्रेलर जबरदस्त बनवून सर्वांची उत्सुकता चाळवली आहे. सिनेमात संजय नार्वेकरांचा कधीही न पाहिलेला खलनायकी अंदाज दिसतोय. २२ नोव्हेंबर २०२४ ला 'रानटी' सिनेमा महाराष्ट्रात रिलीज होतोय.

Web Title: sharad Kelkar upcoming movie Raanti trailer release sanjay narvekar santosh juvekaer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.