100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपदी शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 03:39 PM2020-02-03T15:39:48+5:302020-02-03T15:41:14+5:30

Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : नाट्यसंमेलनाच्या शतकमोहत्सवी वर्षात डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता, दिग्दर्शकाची निवड झाल्याने नाट्यवर्तुळातूनही समाधान व्यक्त केले गेले.

Sharad Pawar inaugurates 100th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan | 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपदी शरद पवार

100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपदी शरद पवार

googlenewsNext

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे नाट्य संमेलन 27 मार्च जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी सांगलीमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे नाट्य संमेलनाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार स्वागताध्यक्ष असणार आहे. खुद्द शरद पवार यांनी ट्विट करून याविषयी सांगितले. शदर पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी माझी भेट घेत यंदाच्या 100 व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची  विनंती केली. कांबळी यांच्या विनंतीचा मी आनंदपूर्वक स्वीकार करत आहे. 

तसेच यंदाचे नाट्यसंमेलन हे भांडणे आणि आरोपांशिवाय पार पडावे यासाठी अनेक प्रयत्नही मंडळाकडून घेतले जात आहेत. 25 मार्चला तंजावरला जाऊन व्यंकोजी राजे ह्यांचं पहिले नमन करणार आणि 26 मार्चला सांगलीत नाट्यदिंडी होईल.  27 मार्चला सांगली येथे नाट्यसंमेलनाचे उदघाटन होणार आहे. तर 14 जूनला मुंबईत समारोप होईल, असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दरम्यान 27 मार्च पासून 7 जून पर्यंत महाराष्ट्र व्यापी वेगवेगळ्या ठिकाणी छोटी छोटी संमेलन होतील.तर दुसरीकडे नाट्यसंमेलनाच्या शतकमोहत्सवी वर्षात डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता, दिग्दर्शकाची निवड झाल्याने नाट्यवर्तुळातूनही समाधान व्यक्त केले गेले. 

Web Title: Sharad Pawar inaugurates 100th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.