महाराष्ट्र दिनी 'वाघेऱ्या' सिनेमाच्या टीमने असे केले श्रमदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 09:04 AM2018-05-02T09:04:54+5:302018-05-02T14:34:54+5:30

गौरमा मीडिया अँड  एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच 'बॉईज' सारखा सुपरहिट ...

Shardhan did this by the team of Maharashtra's 'Waghera' cinema | महाराष्ट्र दिनी 'वाघेऱ्या' सिनेमाच्या टीमने असे केले श्रमदान

महाराष्ट्र दिनी 'वाघेऱ्या' सिनेमाच्या टीमने असे केले श्रमदान

googlenewsNext
रमा मीडिया अँड  एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच 'बॉईज' सारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या 'वाघेऱ्या' हा विनोदी सिनेमा प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी लवकरच येत आहे.समीर आशा पाटील दिग्दर्शित या सिनेमाच्या सर्व टीमने नुकताच 'पाणी फाउंडेशन'च्या पाणी बचाव आंदोलनात आपला सहयोग देत सातारा येथील करंजस्कोप गावात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाश्रमदान केले.पाणी बचाव फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि करंजस्कोप ग्रामस्थांसोबत श्रमदान करताना अभिनेते किशोर कदम आणि किशोर चौघुले यांनी पाणी वाचवण्याचा सामाजिक संदेशदेखील लोकांना दिला.उन्हाच्या वाढत्या कहालीत हास्याचा थंडावा घेऊन येणारा 'वाघेऱ्या' सिनेमा येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.यात ऋषिकेश जोशी, किशोर कदम आणि भारत गणेशपुरे यांची प्रमुख भूमिका असून, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम हे कलाकारदेखील आहेत.

'लांडगा आला रे आला' ही गोष्ट लहानपणी सर्वानीच ऐकली आहे.लांडगा आला म्हणून कुणीतरी खोडी काढायची आणि मग अख्खे गाव जागे व्हायचे,अशी ती गोष्ट होती. या गोष्टीत थोडा फेरबदल केला आणि लांडग्या ऐवजी गावात 'वाघ' आला तर काय गोंधळ उडेल.अगदी हाच गोंधळ 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमातील वेड्यांच्या गावात आपल्याला पाहायला मिळणार आहे.'वाघेऱ्या' या आगामी सिनेमाचे नुकतेच ट्रेलर आणि 'उनाड पोरं' या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले. संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यामधून 'वाघे-या' नामक गावातील गमतीजमती प्रेक्षकांना दिसून येतात.गावात 'वाघ' शिरला असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते.या बातमीमुळे संपूर्ण गाव वाघाच्या दहशतीखाली येते आणि मग या वाघाला पकडण्यासाठी विविध शक्कला लढवल्या जातात. शिवाय, या सगळ्या गोंधळामुळे स्वत:च्या लग्नाला उभा असलेल्या वन अधिका-यालासुद्धा ताबडतोब वाघेऱ्या गावात पाचारण करावे लागते,त्यामुळे त्याच्या मनाची झालेली घालमेल या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते.ग्रामीण विनोदाचा वारू चौफेर उधळवणाऱ्या या ट्रेलरबरोबरच, सिनेमाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील लिखित आणि संगीतकार मयुरेश केळकर दिग्दर्शित 'उनाड पोरं' हे उडत्या चालीचे गाणे देखील यावेळी प्रदर्शित करण्यात आले.आदर्श शिंदेच्या भारदस्त आवाजातील हे गाणे सिनेरासिकांचे भरघोस मनोरंजन करणारे ठरत आहे.

Web Title: Shardhan did this by the team of Maharashtra's 'Waghera' cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.