मैत्रीवर भाष्य करणारा उंडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 11:56 AM2017-08-04T11:56:14+5:302017-08-04T17:27:17+5:30
जगभर पसरलेल्या उंडगा जमातीवर भाष्य करणारा उंडगा हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. फ्रेंडशिप डे ...
ज भर पसरलेल्या उंडगा जमातीवर भाष्य करणारा उंडगा हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने प्रदर्शित होणारा उंडगा हा चित्रपट मैत्रीवर भाष्य करताना पहिल्या प्रेमाचीही गोष्ट सांगून जातो. ही कथा प्रामुख्याने हलक्याफुलक्या विनोदाने आणि साधेपणाने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना गण्या आणि विज्या या दोन जिवलग मित्रांची कथा पाहायला मिळणार आहे. गण्या हा अतरंगी तर विज्या हा सालस आणि कवी मनाचा आहे.
उंडगा या चित्रपटाचे लेखन सुदर्शन रणदिवे यांनी केले आहे. या चित्रपटाविषयी ते सांगतात, मुलांचे भावविश्व समजून घेताना पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. ही कथा माझ्या आयुष्याचा एक भाग होती. ती मी स्वतः जगलो आहे. चित्रपटातील संवादाची भाषा देखील साधी सोपी आहे. त्यामुळे ती प्रेक्षकांना आपलीशी वाटेल."
रेडस्मिथ प्रोडक्शन निर्मित ‘उंडगा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तसेच संगीत दिग्दर्शन विक्रांत वार्डे यांनी केले आहे. ते सांगतात, "लोकांना आपलासा वाटणारा हा विषय असून यात १९९०चा काळ चित्रित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आजच्या काळातील आणि पूर्वीच्या काळातील तफावत अधोरेखित केली आहे.
सायरा सय्यद आणि सिकंदर सय्यद निर्मित उडंगा या चित्रपटात शिवानी बावकरसोबत चिन्मय संत आणि स्वप्निल कणसे हे मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाला उत्तम कलाकारांची टीम लाभली आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तसेच स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, आदर्श शिंदे, रोहित राऊत, नंदेश उमप या नामवंत गायकांचा आवाज या चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.
Also Read : शिवानी बावकरचा उंडगा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस