प्रिया बेर्डेचा विनयभंग करणाऱ्याला तिने शिकवली अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2017 09:49 AM2017-07-17T09:49:16+5:302017-07-17T15:19:16+5:30
प्रिया बेर्डेने अशी ही बनवा बनवी, येडा की खुळा, बजरंगाची कमाल यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तर बेटा, हम आपके है ...
प रिया बेर्डेने अशी ही बनवा बनवी, येडा की खुळा, बजरंगाची कमाल यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तर बेटा, हम आपके है कौन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेच्या मृत्युनंतर तिने अभिनय आणि स्वानंदी या तिच्या मुलांचा खूपच चांगल्याप्रकारे सांभाळ केला आहे. नुकतीच ती तिच्या मुलीसोबत एका चित्रपटगृहात चित्रपट पाहाण्यास गेली होती. त्यावेळी एका माणसाने तिचा विनयभंग केला. प्रियाने त्या माणसाला चांगलीच अद्दल घडवली.
मुंबईतील मीरा रोडमधील एका चित्रपटगृहात प्रिया तिच्या मुलीसोबत म्हणजेच स्वानंदीसोबत चित्रपट पाहायला गेली होती. त्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला आलेले काही लोक पूर्णपणे दारुच्या नशेत होते. चित्रपटगृहात ते खूपच गोंधळ घालत होते. त्यामुळे सगळ्यांनीच त्यांना सुनावले आणि चित्रपटगृहाच्या बाहेर जाण्यास सांगतले. लोकांनी विरोध केल्याने ते तिथून निघून गेले. पण काहीच मिनिटांनंतर प्रियाच्या कंबरेला कोणातरी हात लावत असल्याचे तिला जाणवले. तिने त्या व्यक्तीच्या जोरात थोबाडीत लावून दिली. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या व्यक्तींमधलाच तो एक व्यक्ती असल्याचे तिच्या लक्षात आले. प्रियाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तिला धक्का मारून तो पळून गेला. यात स्वानंदीला धक्का लागला. यानंतर प्रिया चित्रपटगृहाच्या बाहेर पडली आणि तिने मॉलच्या सुरक्षारक्षकांना याबाबत सांगितले. प्रियाला ज्याने धक्का मारला तो मॉलच्या बाहेर गाडीची वाट पाहात असताना सुरक्षारक्षकांना दिसला. सुरक्षारक्षक जवळ येत आहेत हे पाहाताच तो व्यक्ती मॉलमध्ये पळाला. त्यावर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
सुनील जानी असे त्या व्यक्तीचे नाव असून तो एक व्यवसायिक आहे. त्याला पोलिसांनी अटक केले असून त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Also Read : प्रिया बेर्डे का म्हणतेय...माझी मुले समंजस