ट्रिपल सीट फेम शिल्पा ठाकरे आणि अक्षय वाघमारेचे बाप्पाच्या स्वागतासाठी नवं कोरे गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:02 PM2023-09-16T17:02:11+5:302023-09-16T17:11:55+5:30
अभिनेता अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांच्यावर चित्रित झाले आहे.
सगळ्यांचे दु:ख दूर करुन आनंद आणणारा गणपती बाप्पा हा येत्या १९ सप्टेंबर ला आगमन करतोय . आता हा आपला बाप्पा तब्बल १० दिवस पृथ्वीवर येणार तर सगळी कडेच आनंद पसरलाय . अर्थात त्याच्या स्वागतासाठी महाराष्ट्राची एक्सप्रेशन क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली आणि ट्रिपल सीट , भिरकिट , खीचिक , राडा , इभ्रत या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केलेली अभिनेत्री शिल्पा ठाकरे जी आता एक यशस्वी निर्माती सुद्धा झालीय तिने आपल्या सर्व गणेश भक्तांसाठी एक गोड भेट आणली आहे . गणपती बाप्पाच्या स्वागताला बाप्पाचे एक नवे कोरे गाणे तिने निर्मित केले आहे आणि स्वतः त्यात अभिनय सुद्धा केला आहे. नुकतेच तिने तिची नविन निर्मिति संस्था द बिग स्क्रीन स्टूडियो ची स्थापना केली आणि या निर्मिति संस्थे मधील हे दूसरे गाणे आहे .हे गाणे येत्या रविवारी १६ सप्टेंबर या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ते अभिनेता अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांच्यावर चित्रित झाले आहे.
' गणराज आले आले सांगतात ढोल ' हे गाणे ऐकताना गणेश भक्त गणेशाच्या भक्तीत गुंग होतील हे नक्कीच . या गाण्याच्या निर्मिति बाबत सागंताना निर्मात्या शिल्पा ठाकरे म्हणाल्या , " माझे पाहिले गाणे मी शंकर देवावर बनवले. अर्थात शंकराची एक सुंदर आरती मी प्रेक्षकांसाठी आणली आणि ती प्रेक्षकांना आवडली ही , ' गणराज आले आले सांगतात ढोल ' हे मी निर्मित केलेले दूसरे गाणे , या गाण्याला सुद्धा प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे . श्री. गणेश चरणी ही माझी एकविस दुर्वाची जुडी आहे त्यामुळे बाप्पा सुद्धा मला माझ्या प्रवासात मदत करतील ही खात्री आहे."
अर्थात कोणतेही गाणे यशस्वी होण्या मागे अनेक लोकांची मेहनत असते . ' गणराज आले आले सांगतात ढोल ' ह्या गाण्याचे शब्द अतिशय तरल आणि समर्पक शब्दात डॉ . संगीता गोडबोले यानी लिहिले असून संगीतकार आशुतोष कुलकर्णी यांनी संगीतबध्द केले आहे. संगीता तिवारी यांनी कलादिग्दर्शन केले असून गाण्याचे संकलन आशय देशपांडे यांनी केले आहे . गाण्याचे निर्मिति व्यवस्थापक म्हणून सचिन वाडकर यांनी काम पाहिले असून वेशभूषा शिवानी मुकादम तर रंगभूषा भागवत सोनवणे यांनी केले आहे . आणि सर्वात महत्वाचे असतात ते गाण्याचे कॅप्टन, हे गाणे "मायबापा विट्ठला " फेम दिग्दर्शक प्रशांत पांडेकर यांनी दिग्दर्शित केले आहे.