दहीहंडीच्या रंगात रंगली शिष्यवृत्तीची टीम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 01:41 PM2018-08-09T13:41:20+5:302018-08-10T06:00:00+5:30
खरंतर दहीहंडीला अवकाश असतांना वेळेच्या आधी हा उत्सव कसा साजरा होतोय असं वाटत असतांना.मुला – मुलींचा घोळका अचानक नाचता नाचता थांबाला. कालांतराने कळाले की, तिथे ओ थ्री शॉपिंग निर्मित, साज इंटरनेटमेंट सहनिर्मित, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या मराठी सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते.
पावसाळी वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात, हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत मुंबईजवळील शहापूरमधल्या धसई गावात..सगळीकडे ढोल ताशांचा गजरात दहीहंडी उत्सव साजरा केला जात होता. खरंतर दहीहंडीला अवकाश असतांना वेळेच्या आधी हा उत्सव कसा साजरा होतोय असं वाटत असतांना... मुला – मुलींचा घोळका अचानक नाचता नाचता थांबाला... कालांतराने कळाले की, तिथे ओ थ्री शॉपिंग निर्मित, साज इंटरनेटमेंट सहनिर्मित, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या मराठी सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते.
झील पाटील, दुष्यंत वाघ, अनिकेत केळकर या कलाकारांवर हे दही हंडीचे गाणे चित्रित होत होते. दिग्दर्शक अखिल देसाई सांगतात की, “शिष्यवृत्ती हा सिनेमा शाळेभोवती फिरतो. या सिनेमातल्या व्यक्तिरेखा माझ्या खऱ्या आयुष्यातून आल्या आहेत. ही ९०च्या दशकातली गोष्ट आहे, एक शिक्षक आणि त्यांच्या शिष्याची. यातला गावडे शिक्षक शिस्तप्रिय असला तरी तो मुलांना शिक्षा न देता प्रेमाने समजावून सांगणारा आहे. गावातील एका हुशार मुलाकडे गुणवत्ता आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेतांना अडचणी येत आहेत, त्यासाठी हा शिक्षक त्याला मदत करत असतो. सिनेमाच्या शीर्षकाबद्दल ते सांगतात की, शिष्य आणि त्याची वृत्ती असा देखील अर्थ होतो आणि शिष्यवृत्ती असा देखील त्याचा अर्थ होतो..नेमका कुणाला कोणता अर्थ घ्यायचा तो प्रेक्षकांनी सिनेमा बघून ठरवावे.”
दुष्यंत वाघ सांगतो की, “मी आज दहीहंडी उत्सवात सामील झालोय, याचे कारण म्हणजे सिनेमातल्या गोष्टीमध्ये गावात दहीहंडीचा उत्सव आहे, ज्यात मला गावातील शिक्षक म्हणून बोलावण्यात आलं आहे. प्रशांत गावडे या शिक्षकाची भूमिका मी साकारतो आहे. मुलांना फक्त मारणं या विचारांचा तो नाही आहे. खूप संवेदनशील आहे, मुलांमध्ये खूप मिळून मिसळून शिकवणारा तो आहे. दुष्यंत खोडकर असला तरी शिस्तप्रिय गावडे सर साकारताना मला माझ्यात अनेक बदल करावे लागले. माझ्या खऱ्या वयापेक्षा कमी वयाचा हा शिक्षक आहे. झिल पाटील ही माझी नायिका आहे. कथेत पुढे काय घडतं हे आताच सगळं सांगण्यात मज्जा नाही.”
स्मिता पाटीलची भाची म्हणून सध्या चर्चेत असलेली झिल या सिनेमातून पदार्पण करत आहे. झिल आपल्या भूमिकेविषयी सांगते की, “सिनेमात मी सीमा या शिक्षिकेची भूमिका साकारते आहे. जी खूप शांत स्वभावाची आणि समजूतदार आहे. या भुमिकेसाठी मला दिग्दर्शकांनी योग्य मार्गदर्शन तर केलेच शिवाय माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. तशी मी वैयक्तिक जीवनात शिक्षिकाच असल्याने मला विद्यार्थ्यांसोबत काम करताना मज्जा आली.”
अनिकेत केळकर या सिनेमात मोरे सरांची भूमिका सकारात आहेत. अगदी खोचट स्वभावाचा हा मोरे शाळेतल्या कामात नेहमी काहीतरी गोंधळ करतो. आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. अनिकेत सांगतो की, “मोरे हा पूर्णपणे खलनायक नसून त्याच्या भूमिकेला काहीशी ग्रे शेड आहे. अशी भूमिका साकारताना मला एक वेगळाच अनुभव मिळाला.” लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.