Shocking...! मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही अभिनेत्री आता उघडकीस आणणार 'काळे धंदे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:12 IST2019-08-23T16:12:05+5:302019-08-23T16:12:48+5:30
Zee5's Kaale Dhande Webseries: मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही अभिनेत्री तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे असते चर्चेत

Shocking...! मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही अभिनेत्री आता उघडकीस आणणार 'काळे धंदे'
नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने एक फोटो शेअर केला आहे आणि तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितलं आहे.
नेहा खान शिकारी चित्रपटानंतर आता 'काळे धंदे'मध्ये दिसणार आहे. ही वेबसीरिज असून झी५वर पहायला मिळणार आहे. नेहाने या सीरिजच्या मुहूर्ताचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत म्हणाली की, माझा पुढील प्रोजेक्ट. एकाच लफड्यातून अनेकांचे 'गेम' होणार. सगळ्यांचे 'काळे धंदे' आता उघडे पडणार, तुम्ही मात्र हसून हसून येडे होणार! येतेय तुमच्या भेटीला नवीन सिरीज ‘काळे धंदे...!’ लवकरच फक्त #ZEE5 वर !
नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते.
नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे.
याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.
इतकेच नाही तर नेहा शाहरूख खानसोबत जाहिरातीत झळकली आहे. 'युवा' या हिंदी चित्रपटात तिने जिम्मी शेरगिलसोबत काम केलं आहे.