'वेडात मराठे वीर दौडले सात'चं शूटींग थांबलं! अक्षय कुमार साकारतोय छत्रपती शिवरायांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:06 AM2024-06-04T11:06:17+5:302024-06-04T11:06:43+5:30

'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या शूटींगला मोठा ब्रेक लागलाय. सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. काय झालंय नेमकं? (akshay kumar, chhatrapati shivaji maharaj)

shooting of vedat marathe Daudle Veer Daudle Saat was stopped akshay kumar played the role of shivaji maharaj | 'वेडात मराठे वीर दौडले सात'चं शूटींग थांबलं! अक्षय कुमार साकारतोय छत्रपती शिवरायांची भूमिका

'वेडात मराठे वीर दौडले सात'चं शूटींग थांबलं! अक्षय कुमार साकारतोय छत्रपती शिवरायांची भूमिका

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता. अक्षयला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अक्षयने 'हेराफेरी' सारख्या सिनेमांमधून खळखळून हसवलं तर 'बेबी', 'एअरलिफ्ट' सारख्या सिनेमांमधून संवेदनशील विषय सर्वांसमोर आणले. अक्षय आगामी मराठी सिनेमात झळकणार असल्याने सर्वांना उत्सुकता होती.  'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात अक्षय छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार होता. पण या सिनेमाच्या शुटींगला ब्रेक लागणार असल्याचं समजतंय. 

'वेडात मराठे वीर दौडले सात' चं शूटींग थांबलं

महेश मांजरेकर दिग्दर्शित अक्षय कुमारची भूमिका असलेल्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाची सर्वांना खूप उत्सुकता होती. दोन वर्षांपुर्वी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत या सिनेमाची ग्रँड घोषणा झाली. सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचा खुलासा झाला. पण या सिनेमाचं शूटींग सध्या थांबलं असल्याची बातमी येतेय. निर्माते वसीम कुरेशी यांनी वाढलेल्या बजेटमुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्याने शूटींग थांबवलं असल्याची चर्चा आहे.

अक्षय कुमार साकारतोय छत्रपती शिवरायांची भूमिका

अक्षय कुमार 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय हे आपल्या सर्वांना माहितच आहे. काही महिन्यांपुर्वी अक्षयने शिवरायांच्या भूमिकेतील व्हिडीओ शेअर केला होता. पण आता शूटींग थांबल्याने अक्षय त्याचं उर्वरीत भागांचं शूटींग करणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्याने अक्षयला त्याच्या मानधनाचा मोठा हिस्सा देण्यात आलाय. आता 'वेडात मराठे वीर दौडले सात'चं शूटींग कसं पूर्ण होणार आणि सिनेमा कधी भेटीला येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: shooting of vedat marathe Daudle Veer Daudle Saat was stopped akshay kumar played the role of shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.