श्रेयस तळपदेच्या आत्या आहेत हिंदी सिनेइंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहेत त्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 07:00 AM2022-02-13T07:00:00+5:302022-02-13T07:00:00+5:30

आत्यांमुळेच आपल्याला चित्रपटात येण्याची प्रेरणा मिळाल्याचे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade)ने सांगितले होते.

Shreyas Talpade's aunt is a famous actress in Hindi Cineindustry, find out who she is. | श्रेयस तळपदेच्या आत्या आहेत हिंदी सिनेइंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहेत त्या?

श्रेयस तळपदेच्या आत्या आहेत हिंदी सिनेइंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहेत त्या?

googlenewsNext

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade)आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सातत्याने चर्चेत येतो आहे. त्याचे कारण म्हणजे अल्लू अर्जुन अभिनीत पुष्पा (Pushpa Movie) चित्रपट. श्रेयसने पुष्पा चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अल्लू अर्जुनच्या भूमिकेला आवाज दिला आहे. त्याच्या या आवाजाला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळते आहे. 'पुष्पा' हिंदीत हिट होण्याचे श्रेय श्रेयसला दिले जात आहे. फार कमी लोकांना माहित आहे की श्रेयसच्या आत्या या हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. कोण असतील त्या, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर मीना टी (Meena T)आणि जयश्री टी (Jayashree T) या अभिनेत्री श्रेयसच्या आत्या आहेत.

अभिनेता श्रेयस तळपदेचे वडील अभिनेत्री मीना टी. आणि जयश्री टी. यांचे भाऊ आहेत. या दोघी त्याच्या आत्या असल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. त्याच्या आत्या मीना‌. टी आणि जयश्री. टी यादेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

त्याच्या आत्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. याबद्दल त्याने नुकतीच माहिती दिली होती. त्यांच्या पासूनच आपल्याला चित्रपटात येण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले होते.

श्रेयस तळपदेला त्याच्या करियरच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल करावा लागला होता. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे स्टुडिओपर्यंत जायलादेखील पैसे नसायचे. त्यामुळे तो रिक्षाने जायचा. त्याचप्रमाणे खाण्यासाठी पैसे उरायचे नाही, म्हणून तो सॅंडविच खाऊन देखील राहिला आहे. घर भाड्याला अनेकदा पैसे नसायचे, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. श्रेयसने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत पाहायला मिळतो आहे. 

Web Title: Shreyas Talpade's aunt is a famous actress in Hindi Cineindustry, find out who she is.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.