'इलू इलू' सिनेमात श्रीकांत यादव दिसणार रोमँटिक अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:07 IST2025-01-14T17:07:03+5:302025-01-14T17:07:28+5:30

Ilu Ilu Movie : 'इलू इलू' हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Shrikant Yadav will be seen in a romantic role in the movie 'Ilu Ilu' | 'इलू इलू' सिनेमात श्रीकांत यादव दिसणार रोमँटिक अंदाजात

'इलू इलू' सिनेमात श्रीकांत यादव दिसणार रोमँटिक अंदाजात

आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर श्रीकांत यादव(Shrikant Yadav)ने मराठी कलाविश्वात खास ओळख निर्माण केली आहे. हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या नजरेत भरल्या आहेत. या गुणी अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज आगामी 'इलू इलू' (Ilu Ilu Movie) या चित्रपटात दिसणार आहे. ग्लॅमरस अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Meera Jaganath) हिच्या सोबत त्यांचा धमाल लव्ह ट्रॅक पाहायला मिळणार आहे.  

'इलू इलू' या चित्रपटाच्या निमित्ताने मीरा जगन्नाथ आणि श्रीकांत यादव पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात त्यांचा रोमँटिक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं?  याची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित 'इलू इलू' हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

श्रीकांत यादवने साकारली मिलिंद सुर्वेची भूमिका
श्रीकांत यादव म्हणाला की, मिलिंद सुर्वे ही व्यक्तिरेखा मी यात साकारली आहे. आपलं पहिलं प्रेम अचानक समोर आल्यावर  माझी अवस्था काय होणार? याची धमाल या चित्रपटात पहाता येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी आणि मीरा आम्ही  पहिल्यांदाच एकत्र काम केले असले तरी एकमेकांसोबत उत्तम टयुनिंग असल्यामुळे आमच्या या भूमिका आम्ही खूप एन्जॉय  केल्याचे हे दोघे सांगतात.



श्रीकांत यादव आणि मीरा जगन्नाथ या दोघांसोबत बॉलिवूड गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री एली आवराम, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, निशांत भावसार, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत. ‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे.

Web Title: Shrikant Yadav will be seen in a romantic role in the movie 'Ilu Ilu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.