कुछ चीज़े हम पुरानी छोड़ आये हैं म्हणत श्रुती मराठेने शेअर केलं हटके फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 01:00 PM2021-03-03T13:00:00+5:302021-03-03T13:00:02+5:30

तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

Shruti marathe shared a beautiful photoshoot | कुछ चीज़े हम पुरानी छोड़ आये हैं म्हणत श्रुती मराठेने शेअर केलं हटके फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर

कुछ चीज़े हम पुरानी छोड़ आये हैं म्हणत श्रुती मराठेने शेअर केलं हटके फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर

googlenewsNext

श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते.  श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. श्रुतीने तिचे व्हाईट साडीमधलं फोटोशूट शेअर करुन सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत श्रुती एका वेगळ्या लूकमध्ये दिसतेय. कुछ चीज़े हम पुरानी छोड़ आये हैं, आते आते उसकी आँखों में पानी छोड़ आये हैं, ये ऐसा दर्द है जो बयां हो ही नहीं सकता, दिल तो साथ ले आये धड़कन छोड़ आये है असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. चाहत्यांसह सेलिब्रेटीही श्रुतीच्या या फोटोवर फिदा झाले आहेत. 

श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे.

Web Title: Shruti marathe shared a beautiful photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.