'पुण्याची मैना', श्रुती मराठेचा व्हिडीओ पाहून चाहते झाले फिदा, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 07:00 AM2021-06-09T07:00:00+5:302021-06-09T07:00:00+5:30

श्रुती मराठे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते.

Shruti Marathe shared video on Instagram | 'पुण्याची मैना', श्रुती मराठेचा व्हिडीओ पाहून चाहते झाले फिदा, पहा हा व्हिडीओ

'पुण्याची मैना', श्रुती मराठेचा व्हिडीओ पाहून चाहते झाले फिदा, पहा हा व्हिडीओ

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. मात्र यावेळेला ती एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


श्रुती मराठे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले की, पुण्याची मैना..! गालावर नाही पण हनुवटीवर पडते खळी. या व्हिडीओत मला म्हणत्यात हो, म्हणत्यात पुण्याची मैना या गाण्यावर आपल्या अदा दाखवताना दिसते आहे. श्रुतीचा हा व्हिडीओ पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या व्हिडीओवर चाहते कमेंट करत आहेत. तिच्या या व्हिडीओवर अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील कमेंट केली आहे. तिने लिहिले की, नाय नाय आता तू पवईची मैना! सुंदर तर तू आहेसच गं पण कमाल गोडुली दिसत्येस... नसताना! 


श्रुतीने तमीळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 


श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे.

Web Title: Shruti Marathe shared video on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.