शुभंकर तावडेने दिली प्रेमाची कबुली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत शेअर केला रोमँटिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 16:29 IST2024-07-04T16:28:16+5:302024-07-04T16:29:01+5:30
शुभंकर तावडेच्या फोटोवर वडीलांचीही कमेंट

शुभंकर तावडेने दिली प्रेमाची कबुली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत शेअर केला रोमँटिक फोटो
'वेड' फेम अभिनेता शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) सध्या अनेक मराठी सिनेमांमध्ये दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांचा तो मुलगा आहे. शुभंकर तावडे म्हणजे नेहमी हसत राहणारा आणि हसवणारा असा आहे. त्याचे सहकलाकार त्याच्याबद्दल असंच सांगतात. शुभंकरच्या चाहत्यांसाठी सरप्राईज म्हणजे त्याने नुकतीच प्रेमाची कबुली दिली आहे. शुभंकरच्या आयुष्यात आलेली ती मुलगी कोण?
शुभंकर तावडेने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. होळीच्या वेळेसचा हा फोटो दिसतोय. शुभंकर पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये आहे तर त्याच्या गालावर रंग लावला आहे. तर समोर एक मुलगी आहे जिने पांढरा ड्रेस घातला आहे. शुभंकर तिच्याकडे अगदी प्रेमाने बघतानाचा हा गोड फोटो आला आहे. ही मुलगी कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तर ही प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर समीक्षा टक्के (Sameeksha Takke) आहे. शुभंकरने प्रेमाची कबुली देत लिहिले, 'तुम हो! जेव्हा सांत्वनाच्या जागी आनंद येतो."
शुभंकरच्या या पोस्टवर त्याचे वडील सुनील तावडे कमेंट करत म्हणाले, "देव कायम तुमच्या पाठीशी राहो. तुमचं पुढील आयुष्य सुंदर, आनंदी आणि भरभराटीचं जावो. लव्ह यू." याशिवाय मराठीतील इतर कलाकार प्रियदर्शिनी इंदलकर, हृता दुर्गुळे,अमृता खानविलकर, अमृता देशमुख यांनीही कमेंट करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
समीक्षा टक्के ही लाईफस्टाईल, फॅशन, आणि स्पोर्ट्स इन्फुएन्सर आहे. तिने भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. शिवाय तिचे कॉमेडी व्हिडिओही व्हायरल होत असतात. दुसरीकडे शुभंकर तावडे नुकताच 'कन्नी' सिनेमात दिसला. याआधी तो 'वेड','कागर' हेही सिनेमे आले.