श्वेता झाली संस्कृत टिचर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 03:50 PM2016-10-17T15:50:53+5:302016-10-17T15:52:01+5:30
अभिनेत्री श्वेता पेंडसे संस्कृत टिचर झाली हे ऐकून तिच्या चाहत्यांना असेच वाटले असणार की, श्वेता आता पुन्हा कॉलेजच्या विद्यार्थांना ...
class="news-head-big" style="font-family: "Ek Mukta", sans-serif; font-weight: bold; color: rgb(51, 51, 51); font-size: 32px;"> अभिनेत्री श्वेता पेंडसे संस्कृत टिचर झाली हे ऐकून तिच्या चाहत्यांना असेच वाटले असणार की, श्वेता आता पुन्हा कॉलेजच्या विद्यार्थांना शिकविण्यास सुरवात करणार का ? तर तसे बिलकुलच नाही आहे. श्वेता आगामी कौल मनाचा या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना संस्कृत टिचरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. श्वेता चित्रपटांमध्ये येण्याआधी शिक्षिकाच होती. आता ती मोठ्या पडद्यावर देखील पुन्हा एकदा मुलांना शिकवताना दिसणार आहे. एवढेच नाही तर कौल मनाचा या चित्रपटाची कथा आणि संवाद देखील श्वेतानेच लिहीले आहेत. या बद्दल श्वेता सांगते, मी हा चित्रपट ज्यावेळी लिहीत होते तेव्हा मला असे वाटले की या सिनेमात एक संस्कृत शिक्षिका असावी. कारण मला स्वत:ला नेहमीच असे वाटते की संस्कृत भाषेचा प्रसार व्हायला पाहिजे. मग मी या चित्रपटाच्या निमित्ताने संस्कृत शिक्षिकेचे पात्र उभे केले. पण ही भूमिका साकारणार कोण हा प्रश्न होता. मग ही भूमिका मी साकारावी असे आमच्या दिग्दर्शकांनी सांगितले. अशाप्रकारे हा संस्कृत शिक्षिकेची भूमिका माझ्या वाटेला आली. लवकरच आपल्याला समजेल की श्वेता संस्कृत टिचरच्या भूमिकेत काय कमाल करतेय. रेड बेरी एन्टरटेंन्मेंट प्रस्तुत श्री सदिच्छा फिल्म्स निर्मित कौल मनाचा या चित्रपटाची निर्मिती राजेश सुकलाल पाटील, विठ्ठल हनुमंत रूपनवर, नरशी वासानी यांनी केली असून सह निर्मिती निकीता राजेश पाटील यांची आहे.