हा स्वप्नपूर्तीचा आनंद...! सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने शेअर केली ‘गुडन्यूज’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 13:28 IST2022-03-23T13:26:51+5:302022-03-23T13:28:28+5:30
स्वप्नपूर्तीचा योग येतो तेव्हा आनंद ओसंडून वाहतो. सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांच्या आयुष्यात असाच स्वप्नपूर्तीचा योग आला आणि त्याचा आनंद त्यांनी सोशल मीडियावर साजरा केला.

हा स्वप्नपूर्तीचा आनंद...! सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने शेअर केली ‘गुडन्यूज’
मुंबई ही स्वप्नांची नगरी. इथला प्रत्येकजण स्वप्नपूर्तीसाठी झटत असतो. साहजिकच स्वप्नपूर्तीचा योग येतो तेव्हा आनंद ओसंडून वाहतो. मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) आणि त्याची बायको व अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांच्या आयुष्यात असाच स्वप्नपूर्तीचा योग आला आणि त्याचा आनंद त्यांनी सोशल मीडियावर साजरा केला. होय, सिद्धार्थ व मिताली यांनी मुंबईत पहिलं वहिलं घर खरेदी केलं. सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली.
सिद्धार्थ चांदेकरने मितालीसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत दोघांच्याही अंगठ्याला शाई लागलेली दिसतेय. दोघांच्याही चेहºयावरचा आनंद बघण्यासारखा आहे. या आनंदाचं कारण आहे, त्यांचं नवं घर. ‘नवी सुरूवात...मुंबईत पहिलं घर...’, असं कॅप्शन सिद्धार्थने या फोटोला दिलं आहे.
सिद्धार्थ आणि मितालीचं मुंबईतील नवीन घर नेमकं कोणत्या परिसरात आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. या घराची किंमत किती हेही गुलदस्त्यात आहे. पण सिद्धार्थ व मिताली लवकरच या नव्या घरात गृहप्रवेश करणार, हे मात्र निश्चित आहे.
सिद्धार्थ चांदेकरचा ‘झिम्मा’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात सिद्धार्थसोबत सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, मृण्मयी गोडबोले, सायली संजीव, क्षिती जोग, सुहास जोशी आदींच्या भूमिका होत्या.