सिद्धार्थ चांदेकरचं टोपणनाव माहितीये? अभिनेत्याची आई खुलासा करत म्हणाली- "आजोबा त्याला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:14 IST2025-01-09T12:13:58+5:302025-01-09T12:14:12+5:30
'फसक्लास दाभाडे' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईने मजेशीर खुलासा केला (siddharth chandekar)

सिद्धार्थ चांदेकरचं टोपणनाव माहितीये? अभिनेत्याची आई खुलासा करत म्हणाली- "आजोबा त्याला..."
काल 'फसक्लास दाभाडे' सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. या ट्रेलर लाँचला 'फसक्लास दाभाडे' सिनेमातील कलाकारांचं कुटुंब उपस्थित होतं. हा आगळावेगळा ट्रेलर लाँच प्रेक्षक आणि कलाकारांच्या फॅमिलींच्या उपस्थितीत पार पडला. 'फसक्लास दाभाडे'च्या ट्रेलर लाँचला अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई उपस्थित होती. त्यावेळी सिद्धार्थच्या आईने अभिनेत्याला कोणत्या टोपणनावाने घरी हाक मारतात, याचा मजेशीर खुलासा केला. जाणून घ्या.
या मराठी मालिकेवरुन मिळालंय सिद्धार्थला टोपणनाव
सिद्धार्थची आई सीमा चांदेकर या ट्रेलर लाँचला उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की, "सिद्धार्थचा जेव्हा जन्म झाला तेव्हा टीव्हीवर गोट्या ही मालिका सुरु होती. त्यामुळे सिद्धार्थचे आजोबा त्याला तेच म्हणायचे." हे ऐकताच सर्वांमध्ये हशा पिकतो. 'फसक्लास दाभाडे' सिनेमाचा दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमेने माइकवर "गोट्या गोट्या गोट्या" अशी सिद्धार्थला हाक मारली. त्यामुळे वातावरण एकदम खेळकर झालं.
सिद्धार्थच्या 'फसक्लास दाभाडे' सिनेमाची चर्चा
'फसक्लास दाभाडे' सिनेमाचा ट्रेलर लाँच काल पार पडला. या सिनेमात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे, तृप्ती शेडगे हे कलाकार दिसत आहेत. हेमंत ढोमेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. ‘फसक्लास दाभाडें' सिनेमा २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.