"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 09:14 AM2024-10-11T09:14:50+5:302024-10-11T09:15:36+5:30

...म्हणून या वयात दुसरं लग्न केलं, सिद्धार्थ चांदेकरच्या आईने स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या- " ३ वर्षांपूर्वी एका अपघातात..."

siddharth chandekar mother seema chandekar talk about her 2nd marriage at the age of 57 | "या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण

"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण

सिद्धार्थ चांदेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून सिनेसृष्टीत त्याचा जम बसवला. सिद्धार्थ त्याच्या करिअरबरोबरच पर्सनल आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. सिद्धार्थने गेल्या वर्षी त्याच्या आईचं मोठ्या थाटामाटात दुसरं लग्न लावून दिलं होतं. सिद्धार्थच्या या निर्णयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. आता सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांनी पहिल्यांदाच याबाबत भाष्य केलं आहे. 

सीमा चांदेकर यांनी नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ५७ व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचा निर्णय का घेतला? याबाबत सांगितलं. त्या म्हणाल्या, "पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घ्यायला देखील मला खूप वर्ष लागली. मुलं सेटल झाली, आता त्यांचं सगळं झालंय म्हणून मी हा निर्णय घेतला असंही नाही. कारण ते दोघेही माझ्याबरोबर होतेच. त्यामुळे मला एकटं वाटायचं असं काहीच कारण नव्हतं. पण, ३ वर्षांपूर्वी माझा एक अपघात झाला होता.  त्यावेळी माझ्या उजव्या हातात प्लेट होती. त्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नव्हते. सिद्धार्थ सुमेधादेखील मला येऊन भेटत होते. आमचं व्हिडिओ कॉलवर बोलणं होत होतं". 


पुढे त्या म्हणाल्या, "या वयात बाकीच्या कुठल्या गरजांसाठी म्हणून आपण लग्न करत नाही. या वयात लग्न करण्याची काय आवश्यकता आहे, असंही म्हटलं जातं. माझ्यासारख्याच प्रत्येक बाईने हा विचार करावा असंही माझं म्हणणं नाही. प्रत्येकीचा विचार वेगळा असेल. अपघाताच्या वेळी मला कुठेतरी एकटं वाटू लागलं होतं. म्हणजे मला असं सांगायचंय की माझी बाई आलेली नाही. आणि मला त्रास झालाय तर मी हे सिद्धार्थला फोनवर सांगू नाही शकत. किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील. म्हणजे आज आम्ही मैत्रिणी भेटलो, खूप मजा आली. तर हे सगळं मी प्रत्येकवेळेस मुलांना सांगू शकत नाही. मुलं ऐकतात, पण, त्यांच्याकडे तेवढा वेळही पाहिजे ना...हे मला कुठेतरी हळूहळू जाणवायला लागलं होतं".

सीमा चांदेकर यादेखील अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवतच सिद्धार्थनेही कलाविश्वात काम करण्याचा निर्णय घेतला. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सीमा यांनी दुसरं लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या या धाडसी निर्णयाला अभिनेत्यानेही पाठिंबा दिल्याने त्याचंही कौतुक झालं होतं. 

Web Title: siddharth chandekar mother seema chandekar talk about her 2nd marriage at the age of 57

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.