'मदर्स डे'निमित्त सिद्धार्थ चांदेकरची आईसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 14:32 IST2024-05-12T14:25:13+5:302024-05-12T14:32:41+5:30
जगभरात आज 'मदर्स डे' (Mothers Day 2024) साजरा होत आहे.

'मदर्स डे'निमित्त सिद्धार्थ चांदेकरची आईसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...
जगभरात आज 'मदर्स डे' (Mothers Day 2024) साजरा होत आहे. सर्वसामान्य मंडळींसह मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटीदेखील त्यांच्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेदेखील आईबरोबर एक खास फोटो शेअर केला आहे. याशिवाय त्याने त्याच्या आईला एक गोड सरप्राइज सुद्धा दिलं आहे.
सिद्धार्थ 'मदर्स डे' निमित्त पोस्ट करत म्हणतो, 'जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आई…खरंतर रोजच तुझा दिवस असतो. आज म्हटलं आपला फोटो टाकावा'. याचबरोबर त्याने आईला एक गिफ्ट दिलं आहे. एका नामांकित ब्रॅण्डच्या कॉफी कपवर सिद्धार्थने त्याच्या आईसाठी 'आय लव्ह यू आई…हॅप्पी मदर्स डे' असं लिहलं. तसंच कपाच्या दुसऱ्या बाजूला 'सीमा' असं त्यांचं नाव देखील लिहिण्यात आलं आहे. हे दोन्ही फोटो सिद्धार्थने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
सिद्धार्थ त्याच्या संपूर्ण नावात सुद्धा आईचं नाव लावतो. मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमधून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सुरुवातीपासून प्रचंड मेहनत करून त्याने आयुष्यात एवढा मोठा टप्पा गाठला आहे. या सगळ्यात सिद्धार्थला त्याच्या आईची मोठी साथ मिळाली. एवढंच नव्हे तर या मायलेकांनी मिळून एका मालिकेत एकत्र सुद्धा काम केलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने त्याच्या आईचे मोठ्या थाटामाटात दुसरे लग्न लावून दिले. त्याच्या या धाडसी निर्णयाचं सर्वत्र कौतुक झाले होते.
सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, शेवटचा तो 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटात पाहायला मिळाला. यात तो सई ताम्हणकरसोबत झळकला होता. या सिनेमातून एक आगळीवेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तर याआधी तो 'झिम्मा २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.