Mitali Mayekar : “हे देवा, आम्ही जे काही केलं...”, मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरने मागितली देवाची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:29 AM2023-04-13T11:29:34+5:302023-04-13T11:30:19+5:30

Mitali Mayekar : मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर का मागतेय देवाची माफी,काय आहे कारण?

Siddharth Chandekar Wife Marathi Actress Mitali Mayekar asked for God's forgiveness | Mitali Mayekar : “हे देवा, आम्ही जे काही केलं...”, मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरने मागितली देवाची माफी

Mitali Mayekar : “हे देवा, आम्ही जे काही केलं...”, मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरने मागितली देवाची माफी

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Sidharth Chandekar ) आणि त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali mayekar) हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल. दोघंही सतत चर्चेत असतात. या नवरा-बायकोच्या प्रेमाचा गोडवा तो काय सांगावा. एकमेकांसाठी रोमॅन्टिक पोस्ट शेअर करताना दिसतात. सध्या मात्र मितालीने शेअर केलेल्या फोटोंची चर्चा आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गेल्या काही दिवसांपासूप राज्यभरात अवकाळी पावसाने  धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसतोय. काल देखील मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अवकाळी पाऊस कोसळला. मुंबईसह काही परिसरात विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. मितालीने या विजांच्या कडकडाटाचे काही फोटो शेअर केले आहेत.

विजांच्या कडकडाटाचा एक व्हिडीओही तिने पोस्ट केला. इन्स्टाग्रामवरही एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीला दिलेलं कॅप्शन सध्या लक्ष वेधून घेतयं.
“हे देवा, आम्ही जे काही केलं आहे, त्यासाठी आम्हाला खरंच माफ कर”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. शिवाय “कृपया हे थांबवा” असं म्हणत आणखी एक फोटोही शेअर केला आहे.

मितालीने वयाच्या तेराव्या वर्षी इरफान खानच्या बिल्लू या सिनेमात पहिल्यांदा काम केलं. असंभव, अनुबंध, भाग्यलक्ष्मी, उंच माझा झोका आणि तू माझा सांगाती अशा मराठी मालिकांमध्ये ती सहायक अभिनेत्री म्हणून झळकली.  2016 मध्ये आलेल्या फ्रेशर्स या मालिकेत तिने साकारलेली सायली बनकर नावाच्या मुलीची भूमिका प्रचंड गाजली होती.2015 मध्ये तीन उर्फी या सिनेमातून मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केलं. 2016 च्या यारी दोस्ती या सिनेमातही ती होती. तिनं महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर या एका मराठी रिअ‍ॅलिटी शो मध्ये ही भाग घेतला होता आणि ती सेमी फायनलमध्ये पोहोचली होती.
 

Web Title: Siddharth Chandekar Wife Marathi Actress Mitali Mayekar asked for God's forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.