सिद्धार्थ जाधवने ओढला बाप्पाचा रथ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणरायाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:57 PM2023-09-28T13:57:29+5:302023-09-28T13:58:29+5:30

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही यंदा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागा झाला. सिद्धार्थने विर्सजन मिरवणुकीत ढोलवादन केलं.

siddharth jadhav and saurabh gokhale participated in shrimant bhausabeh rangari ganpati visarjan | सिद्धार्थ जाधवने ओढला बाप्पाचा रथ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणरायाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल

सिद्धार्थ जाधवने ओढला बाप्पाचा रथ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणरायाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज भाविक त्याच्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. मुंबईबरोबरच पुण्यात गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह असतो. पुण्यातील मिरवणुका हा कायमच चर्चेचा विषय असतो. दरवर्षी अनेक मराठमोळे कलाकारही लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. 

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही यंदा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागा झाला. सिद्धार्थने विर्सजन मिरवणुकीत ढोलवादन केलं. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत सिद्धार्थ जाधव आणि अभिनेता सौरभ गोखले सहभागी झाले होते. आकर्षक रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक काढण्यात आली होती. सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखलेने बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणरायाचा रथ ओढला. 

सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले यांच्याबरोबर अनेक मराठी कलाकार बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. सिद्धार्थ आणि सौरभबरोबर तेजस्विनी पंडीत, अनुजा साठेदेखील पुण्यातील बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

Web Title: siddharth jadhav and saurabh gokhale participated in shrimant bhausabeh rangari ganpati visarjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.