सिद्धार्थ जाधवला मिळाला धनाजीच्या भूमिकेसाठी पुरस्कार, लेकीनं असा व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 02:14 PM2022-08-26T14:14:35+5:302022-08-26T14:21:36+5:30

‘दे धक्का 2’मधील धनाजीच्या भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधवला पुरस्कार मिळाला आहे. सेलिब्रेटींसह चाहत्यांनी त्यांचं सोशल मीडियावर अभिनंदन करतायेत.

Siddharth Jadhav won the award for the role of Dhanaji from De Dhakka 2 movie | सिद्धार्थ जाधवला मिळाला धनाजीच्या भूमिकेसाठी पुरस्कार, लेकीनं असा व्यक्त केला आनंद

सिद्धार्थ जाधवला मिळाला धनाजीच्या भूमिकेसाठी पुरस्कार, लेकीनं असा व्यक्त केला आनंद

googlenewsNext

‘दे धक्का’ या चित्रपटाची सीक्वल ‘दे धक्का 2’ ( De Dhakka 2) काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘दे धक्का 2’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यातील धनाजीच्या भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधवला पुरस्कार मिळाला आहे. त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियाव सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आपले फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असतो. नुकताच सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या व्हायरल होतेय. फोटोमध्ये सिद्धार्थसोबत त्याची लेक इराही दिसतेय. सिद्धार्थच्या लेकीच्या हातात पुरस्कारची ट्रॉफी दिसतेय. हा पुरस्कार सिद्धार्थला दे धक्का सिनेमातील धनाजीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून मिळाला आहे. सेलिब्रेटींसह चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. 

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२चा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार सिद्धार्थने पटकावला आहे. त्याने महेश मांजरेकर आणि अमेय खोपकर यांचे या पोस्टमध्ये आभार मानले आहेत. दरम्यान लवकरच सिद्धार्थ जाधव छोट्या पडद्यावर दिसणार आहे. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Aata Hou De Dhingana) या कार्यक्रमाचे तो सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. 
 

Web Title: Siddharth Jadhav won the award for the role of Dhanaji from De Dhakka 2 movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.