सिद्धार्थ जाधवच्या आईचा विशेष पुरस्काराने गौरव, शेअर केली अभिमानास्पद पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:23 IST2025-04-11T12:22:43+5:302025-04-11T12:23:32+5:30
आईला पुरस्कार मिळताच सिद्धार्थ सोशल मीडियावर अभिमानास्पद पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थ जाधवच्या आईचा विशेष पुरस्काराने गौरव, शेअर केली अभिमानास्पद पोस्ट
Siddharth Jadhav Post For Mother: अख्या महाराष्ट्राचा 'सिद्धू' म्हणजेच सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा अस्सल मराठी माणूस. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने अभिनय आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्याचं स्थान निर्माण केलं. त्यानं मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवली आहे. अभिनयाबरोबरच त्याच्या स्टाइलचे लाखो चाहते आहेत. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर सक्रीय असतो. या माध्यमातून तो चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील अपडेट देत असतो. आताही त्यानं एक आनंदाची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सिद्धार्थ जाधवच्या आईचा 'महाराष्ट्र भूषण राजमाता जिजाऊ २०२५' ( Maharashtra Bhushan Rajmata Jijau Award 2025) या विशेष पुरस्काराने गौरव झाला आहे. आईला पुरस्कार मिळताच सिद्धार्थ सोशल मीडियावर अभिमानास्पद पोस्ट शेअर केली आहे. त्यानं आईचा पुरस्कासोबतचा फोटो पोस्ट करत लिहलं, "महाराष्ट्र भूषण राजमाता जिजाऊ पुरस्कार' २०२५ 'आदर्श माता पुरस्कार' सौ. मंदाकिनी (तारा) रामचंद्र जाधव. आईला मिळणारा हा पहिला पुरस्कार… तोही राजमाता जिजाऊ यांच्या नावाने… अजून एक स्वप्नपूर्ती… आये आता थांबायच नाय! हार्दिक हार्दिक अभिनंदन", असं म्हणत त्याने आनंद व्यक्त केलाय.
सिद्धार्थ या पोस्टवर शुभेच्छांच्या असंख्य कमेंट आल्या आहेत. 'व्वा व्वा... आईंचे खूप खूप अभिनंदन', 'अभिनंदन', 'सिध्दू शेठ तुम्हाला पण खूप खुप शुभेच्छा', अशा कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला आहे. काहींनी हार्ट इमोजी पोस्ट केलेत. सिद्धार्थ जाधव आणि त्याचं आई-वडिलांवरील प्रेम हे सर्वांनाच ठाऊक आहे. अनेक मुलाखतींमधून त्याने आई-वडिलांविषयी भाष्य करताना दिसतो. सिद्धार्थच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर 'आता थांबायचं नाय' या चित्रपटातून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात भरत जाधव, आशुतोष गोवारीकर, ओम भूतकरसारखे अनेक कलाकार आहेत. येत्या १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.