घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सिद्धार्थ जाधवनं पत्नीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला - 'तृप्ती ही माझ्या....'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:01 IST2022-08-12T13:00:46+5:302022-08-12T13:01:14+5:30
Siddharth Jadhav: काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ जाधव पत्नीसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता.

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सिद्धार्थ जाधवनं पत्नीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला - 'तृप्ती ही माझ्या....'
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ जाधव पत्नीसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता. या वृत्तांमुळे त्याला फार मनस्ताप झाल्याचे त्याने म्हटले होते. या चर्चेदरम्यान तो दुबईत फिरायला गेला होता. त्यावेळेस त्याच्यासोबत मुली आणि पत्नीदेखील होती. मात्र, फोटोत त्याची पत्नी त्याच्यासोबत दिसली नाही. त्यामुळे ते वेगळे होणार की काय अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता त्याने नुकतीच एक मुलाखत दिली असून त्यामध्ये त्याने याबाबत खुलासा केला आहे.
सिद्धार्थ जाधवनेने सांगितले की, माझ्या पडत्या काळामध्ये मला माझ्या पत्नीने फार मदत केली. तृप्ती ही माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे. तिने मला कायमच मदत केली आहे. मला माझं काही चुकत असेल तर तिने मला मदतही केली आहे. त्याचप्रमाणे बरं वाईट देखील सांगितलं आहे. त्यामुळे सिद्धार्थ जाधव याने आता त्याच्या पत्नी सोबतच्या वादाच्या बातम्यावर पडदा टाकून आम्ही दोघेही एकत्रच असल्याचे सांगितले आहे.
सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती यांचे लव्हमॅरेज असून त्यांनी २००७ साली लग्न केले. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थचा नुकताच ‘दे धक्का’ या चित्रपटाचा सीक्वल ‘दे धक्का 2’ ( De Dhakka 2) रिलीज झाला. पहिल्या भागाइतकाच दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.