सिद्धार्थला आवडतात वजनदार मुली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2016 03:10 PM2016-11-05T15:10:46+5:302016-11-10T10:02:09+5:30

         होय.. हे खरे आहे, सिद्धार्थ चांदेकरला वजनदार मुली आवडतात. तुम्हाला वाटलेना आश्चर्य पण असे आम्ही सांगत ...

Siddhartha likes the weighty girls | सिद्धार्थला आवडतात वजनदार मुली

सिद्धार्थला आवडतात वजनदार मुली

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
       होय.. हे खरे आहे, सिद्धार्थ चांदेकरला वजनदार मुली आवडतात. तुम्हाला वाटलेना आश्चर्य पण असे आम्ही सांगत नाही तर खुद्द  सिद्धार्थ या गोष्टीचा खुलासा केला आहे. सोशल साईट्सवर देखील त्याने ही गोष्ट कबुल केली आहे. सध्याच्या मुलांना एकदम बारीक, झिरो साईज फिगरमधील मुली आवडत असुन सिद्धार्थ मात्र वजनदार मुलींच्या प्रेमात का आहे? असे प्रश्न पडले असतील ना तर जरा थांबा, जास्त विचार करु नका, कारण सिद्धार्थला वजनदार मुली आवडतात खºया पण त्या रिअल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये. आगामी वजनदार या चित्रपटात सिद्धार्थला गोलु पोलु प्रिया बापट आवडत असते. अलोक दिक्षित असे या चित्रपटात त्याच्या पात्राचे नाव आहे. त्याला भारतीय चणीच्या म्हणजेच जरा भारदस्त, वजनदार मुली या चित्रपटात आवडत असल्याचे दाखविण्यात आले आहे. अलोक त्यांची काळजी करतो, त्यांच्याशी प्रामाणिक राहतो, त्यामुळे अलोक सारखे सगळ््यांनी बना अशाप्रकारची एक पोस्ट नुकतीच सिद्धार्थने सोशल साईट्सवर शेअर केली आहे. सई आणि प्रिया या दोघींनीही या चित्रपटात चांगलेच वजन वाढवले होते. मात्र सिद्धार्थला  या चित्रपटासाठी जवळपास आठ किलो वजन कमी करावे लागले असल्याचे त्याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. अभिनेता  सिदधार्थ चांदेकर प्रेक्षकांना नेहमीच त्याच्या प्रत्येक चित्रपटातून वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. आता वजनदार या आगामी चित्रपटात देखील तो एकदम हटके भूमिकेत त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने चांगलीच मेहनत घेतली असल्याचे पाहायला मिळतेय.  सिद्धार्थचा लुक देखील जरा वेगळा या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे. 

Web Title: Siddhartha likes the weighty girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.