​‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 04:55 AM2017-08-12T04:55:06+5:302017-08-12T10:25:06+5:30

सध्या मराठी रंगमंचावर अनेक वेगळी आशय असलेली नाटके प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत लेखक, नाटककार, गीतकार ...

Silver Medal of the play 'Crime Mech Kiya' | ​‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव

​‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव

googlenewsNext
्या मराठी रंगमंचावर अनेक वेगळी आशय असलेली नाटके प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत लेखक, नाटककार, गीतकार म्हणून सुपरिचित नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. सहज सुंदर भाषा आणि पकड घेणारे संवाद असलेल्या त्यांच्या अनेक चित्रपट आणि नाटकांना रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘अपराध मीच केला’ हे त्यांनी लिहिलेलं नाटक प्रचंड गाजले होते. १९६४ साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकाची तब्बल ५२ वर्षांनंतर ‘किवी प्रॉडक्शन्स’च्या माध्यमातून पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ व ‘करायला गेलो एक’ या दोन यशस्वी नाटकांनंतर किशोर सावंत आता विवेक नाईक यांच्या साथीने ‘अपराध मीच केला’ हे गाजलेलं सलग तिसरे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. 
अपराध मीच केला हे नाटक अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून शुक्रवारी १८ ऑगस्टला बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग रंगणार आहे. या प्रयोगाची सध्या जोरदार तयारी नाटकाची टीम करत आहे.
नाटकाची ही रौप्य महोत्सवी वाटचाल आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट असून याचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस निर्माते किशोर सावंत यांनी व्यक्त केला. नाटकाचे दिग्दर्शन विजय गोखले यांनी केले असून रमेश भाटकर, विजय गोखले, विघ्नेश जोशी, किशोर सावंत, संजय क्षेमकल्याणी, विलास गुर्जर, बालकलाकार यश जोशी, सुमंत शिर्सेकर, निशा परुळेकर, प्रियंका कासले यांच्या या नाटकात मुख्य भूमिका आहेत.
अपराध मीच केला या नाटकाची कथा, कलाकारांच्या भूमिका रसिकांना प्रचंड आवडत आहेत.

Also Read : ...लवकरच येणार ‘माहेरची साडी’चा सीक्वल! 

Web Title: Silver Medal of the play 'Crime Mech Kiya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.