सुबोध करणार सिक्स पॅक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 16:17 IST2017-01-04T16:16:34+5:302017-01-04T16:17:57+5:30
अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांच्या त्याच्या प्रत्येक चित्रपटातच वेगळ््या भूमिकांमध्ये नेहमीच दिसतो. व्हर्सटाईल अॅक्टर म्हणुन देखील सुबोधकडे पाहीले जाते. सुबोधने ...
.jpg)
सुबोध करणार सिक्स पॅक?
अ िनेता सुबोध भावे प्रेक्षकांच्या त्याच्या प्रत्येक चित्रपटातच वेगळ््या भूमिकांमध्ये नेहमीच दिसतो. व्हर्सटाईल अॅक्टर म्हणुन देखील सुबोधकडे पाहीले जाते. सुबोधने नेहमीच दर्जेदार चित्रपट करुन अनेक पुरस्कारांवर देखील मोहोर उमटविली आहे. आता सुबोध एका आगामी चित्रपटासाठी पिळदार शरीरयष्टी बनविणार असल्याचे समजतेय. लवकरच तो सिक्स पॅक अॅब्स बनविण्याच्या तयारीला लागणार असल्याचे कळतेय. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचे गुरु म्हणुन प्रसिदध असलेले शैलेश परुळेकर सर सुबोधला यासाठी मदत करणार असल्याचे बोलले जातेय. पुरुळकर सरांनी याआधी बालगंधर्व आणि लोकमान्य या चित्रपटांसाठी सुबोधला ट्रेनिंग दिले होते. आता पुन्हा एकदा सुबोध जिमला जाणार असे दिसतेय. शैलेश परुळेकर यांनी अभिनेत्री प्रिया बापटला देखील वजनदार या चित्रपटासाठी ट्रेनिंग दिले होते. प्रियाचा वजनदार प्रवास केवळ त्यांच्यामुळेच झाला होता. फॅट टू फिट प्रिया परुळेकरांच्या जिम मध्ये वर्कआऊट करुनच झाली होती. तर नटरंग या चित्रपटासाठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांना परुळेकर यांनी मार्गदर्शन केले होते. अतुलच्या नटरंग मघील शरीरयष्टीचे सर्वांनीच कौतुक केले होते. आता सुबोध देखील पुन्हा एकदा फिटनेससाठी सज्ज झाल्याचे दिसतेय. सुबोध वजन वाढवणार आहे की कमी करणार हे मात्र अजुन तरी समजलेले नाही. परंतू तो आगामी सिनेमासाठी नक्कीच काहीतरी खास आणि धमाकेदार करणार असे दिसतेय. परुळेकर सरांच्या जिममधला एक फोटो देखील सुबोधने सोशल साईट्सवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुबोधसोबत त्याची पत्नी आणि दोन मुले दिसत आहेत. सुबोध पुन्हा एकदा जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठी फारच उत्सुक असल्याचे पाहायला मिळतेय. आता बघुयात कोणत्या चित्रपटात आपल्याला सुबोधचे सिक्स पॅक अॅब्स दिसतात.
![]()