पन्नाशीतही स्लिम-ट्रिम,अभिनेत्रीच्या एक्सरसाइजचा व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 04:54 PM2023-08-04T16:54:50+5:302023-08-04T16:56:29+5:30
Aishwarya Narkar : वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य अबाधित आहे.
उत्तम अभिनयासह सौंदर्याची जोड असलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar). वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य अबाधित आहे. विशेष म्हणजे त्यांचा फिटनेस एखाद्या २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असाच आहे. त्यामुळे त्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. एवढंच नाही तर त्यांच्या फिटनेसचं किंवा ग्लोइंग स्कीनमागील रहस्य काय हे जाणून घेण्याचाही अनेक जण प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांनी आता त्यांच्या फिटनेसचं सीक्रेट सांगितलं आहे.
ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या पोस्टच्या माध्यमातून चर्चेत येत असतात. दरम्यान त्यांनी नुकतीच एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये कठीण वर्कआऊट करताना दिसते आहेत. त्यांनी वर्कआऊटच्या माध्यमातून फिटनेस जपल्याचे दिसून येत आहे.
ऐश्वर्या नारकर लोकप्रिय अभिनेत्री असून त्या कायम त्यांच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असतात. वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफिटमध्ये त्या वरचेवर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.
या आधी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या तमन्ना भाटियाच्या गाण्यावरील व्हिडिओची प्रचंड चर्चा रंगली होती. त्यांच्या या रीलने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. सध्या ऐश्वर्या या झी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.