'पप्पी दे पारूला' फेम स्मिता गोंदकरचा हॉट अवतार व्हायरल, पाहा Sizzling Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 17:50 IST2018-12-27T17:45:52+5:302018-12-27T17:50:01+5:30
याआधीही विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.कधी स्विम सूटमध्ये तर कधी अन्य हॉट अंदाजातील तिचे फोटोशूट समोर आले होतं.

'पप्पी दे पारूला' फेम स्मिता गोंदकरचा हॉट अवतार व्हायरल, पाहा Sizzling Photos
विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत स्मिताने रसिकांच्या मनात घर केलं आहे. मात्र यापेक्षाही पप्पी दे पारुला या गाण्यातील बिकीनी परिधान केलेल्या स्मिताचा हॉट अंदाज आजही तिचे चाहते विसरलेले नाहीत. आपल्या भूमिकांमुळेच नाही तर आपल्या सेक्सी अदा आणि हॉट अवतारने अभिनेत्री स्मिता गोंदकरनं सा-यांना भान विसरण्यास भाग पाडलंय...बिग बॉस या रिअलिटी शोमुळे घराघरात पोहचलेली स्मिता गोंदरकर पुन्हा चर्चेत आली आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे हा तिचा खास फोटो.
तसेही सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. असेच काहीसे स्मिताबद्दलही पाहायला मिळत आहे. तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूक मुळे ती सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत आहे.तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. स्मिताचा हा हॉट आणि बोल्ड अंदाज तसंच कुणालाही घायाळ करतील अशा मादक अदा या फोटोत पाहाला मिळत आहेत. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे स्मिताचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
याआधीही विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.कधी स्विम सूटमध्ये तर कधी अन्य हॉट अंदाजातील तिचे फोटोशूट समोर आले होतं. याआधी प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने स्मिताची सेक्सी अदा आपल्या कॅमे-याच्या लेन्समध्ये कैद केली होती.
दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या स्मिताने आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे.स्मिताच्या या हॉट-सेक्सी तरी त्यातील काहीसे वेगळेपण असणा-या फोटोला रसिकही डोक्यावर घेतील यांत शंका नाही. तिचा हा फोटो जितका हॉट, सेक्सी आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्मिताचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.