स्मिता तांबे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर झळकणार रुपेरी पडद्यावर, दिसणार आव्हानात्मक भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:23 PM2022-04-18T17:23:58+5:302022-04-18T17:24:29+5:30

Smita Tambe: खेडयात राहणाऱ्या ऊसतोडणी कामगाराच्या भूमिकेत स्मिता तांबे दिसणार आहे.

Smita Tambe will be seen on cinema after long time, appearing in challenging roles | स्मिता तांबे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर झळकणार रुपेरी पडद्यावर, दिसणार आव्हानात्मक भूमिकेत

स्मिता तांबे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर झळकणार रुपेरी पडद्यावर, दिसणार आव्हानात्मक भूमिकेत

googlenewsNext

नवनवीन भूमिकांसाठी सतत आग्रही असणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe). चित्रपट, मालिका, वेबसिरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका करत आपल्या अभिनयाच्या छटा दाखवणारी ही गुणी अभिनेत्री बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ती  ‘लगन’ (Lagan Marathi Movie) या मराठी चित्रपटात आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. जी.बी.एंटरटेंन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर दिग्दर्शित ‘लगन’ हा मराठी चित्रपट ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 खेडयात राहणारी ऊसतोडणी कामगाराची भूमिका स्मिताने लगन चित्रपटात साकारली आहे. करारी, कणखर तरीही सोज्वळ अशा छटा या व्यक्तिरेखेला आहेत. स्मिताचा खेडवळ लूक यामध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वत: बैलगाडी चालवली आहे. ऊसाच्या भल्यामोठया मोळया डोक्यावर घेत उन्हातान्हात शूटिंग केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांतून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.   


या भूमिकेबद्दल स्मिता सांगते की, ‘हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंददायी आणि तेवढंच आव्हानात्मक होते. मुळात प्रत्येक स्त्री मध्ये खूप माया दडलेली असते. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडपड असते. हे पात्र साकारताना,  प्रत्येक आईची ती तळमळ दाखवणं, एवढंच मी या माझ्या भूमिकेतून केलं आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने गावातील जीवनपद्धती पुन्हा एकदा जवळून बघता आली याचा ही आनंद आहे’.
‘लगन’ चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.

Web Title: Smita Tambe will be seen on cinema after long time, appearing in challenging roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.