म्हणून मराठी दिग्गज कलाकार करणार हा 'सोहळा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 07:18 AM2018-06-11T07:18:04+5:302018-06-11T12:48:04+5:30

प्रस्तुत कर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया आणि सुरेश गुंडेचा यांच्या अरिंहत फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित गजेंद्र ...

So Marathi singer will do this 'Sohal'! | म्हणून मराठी दिग्गज कलाकार करणार हा 'सोहळा'!

म्हणून मराठी दिग्गज कलाकार करणार हा 'सोहळा'!

googlenewsNext
रस्तुत कर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया आणि सुरेश गुंडेचा यांच्या अरिंहत फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित गजेंद्र अहिरे दिग्दर्शित मराठी चित्रपट‘सोहळा’च्या सिनेमाचा पोस्टर व ट्रेलर लाँच करण्यात आला.यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम आणि सिनेक्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.के सी बोकाडिया यांनी मिडियाबरोबर बोलताना सांगितले, हा माझा मराठी भाषेतील पहिला चित्रपट आहे. एका आगळ्या-वेगळ्या संवेदनशील विषयावर सिनेमा बनवला असून रसिकांनाही नक्कीच आवडेल याची खात्री वाटते.

 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गजेंद्र अहिरे या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.विशेष म्हणजे एव्हरग्रीन सचिन पिळगांवकर आणि शिल्पा तुळसकर यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटांत विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, भारत गणेशपुरे व आस्था खामकर आणि इतर कलाकारांच्या भूमिका देखील तेवढ्याच महत्वपूर्ण आहेत. चित्रपटाचे कथानक हे आजच्या विभक्त छोट्या कुटुंबांच्या काळातले आहे.या चित्रपटात नातेसंबंधातील झालेला बदल आणि नात्यांमध्ये आलेलं वेगळेपण दाखविण्याचा वेगळा प्रयत्न केला आहे.

 

अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी सांगितले,चित्रपटाच्या नावातच सिनेमाची कथा लपलेली आहे. नात्या गोत्यांच्या संबंधातून रंगणारा हा एक आगळा वेगळा सोहळा आहे. जुन्या काळी सर्व कुंटुंब एकत्र राहत असे, आता काळ बदलला या आधुनिक काळात अत्यंत छोट्या कुटुंबांचे रुप प्राप्त झाले आहे. हा चित्रपट घरांतील प्रत्येक जणासाठी एक ‘सोहळा’ आहे. या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकरने केले असून संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे. हिंदी सिनेक्षेत्रातले दिग्गज के सी बोकाडिया यांच्या मराठीतल्या पदार्पणाची सिनेसृष्टीला विशेष उत्सुकता आहे.

Web Title: So Marathi singer will do this 'Sohal'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.